कोरोनाकाळातही महाविकास आघाडी सकारचे काम अखंड सुरु; प्रदर्शनातील माहिती पाहून शासनाच्या कामगिरीचा अभिमान वाटला-भेट देणाऱ्या नागरिकांच्या भावना !

जनसेवेची महाविकास आघाडी' ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनाकाळातही महाविकास आघाडी सकारचे काम अखंड सुरु; प्रदर्शनातील माहिती पाहून शासनाच्या कामगिरीचा अभिमान वाटला-भेट देणाऱ्या नागरिकांच्या भावना !
 

    नाशिक, ( जिमाका )::-कोरोनाकाळात सगळे बंद असतांना महाविकास आघाडी सरकारने अखंड सेवा देऊन जनतेची सेवा केली आहे. तसेच शासनाने गेल्या दोन वर्षात रस्त्यापासून ते कृषी विकासापर्यंत असा सर्वांगीण विकास केला आहे. शासनाची दोन वर्षातील कामगिरी पाहून अभिमान वाटला, अशी भावना महानगरपालिकेचे उपशिक्षक अनिल माने यांनी व्यक्त केली. 

            मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर  आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी' ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या उपशिक्षक अनिल माने यांनी प्रदर्शनाच्या  भेटी प्रसंगी आपली भावना व्यक्त केली. 
            प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती मिळाली. या सर्व योजना सर्व सामान्यांपर्यंत गेल्यास नक्कीच महाराष्ट्रात एकमेकांच्या बरोबर सगळ्यांचा विकास करू शकतो, असेही श्री. माने यांनी सांगितले.
_____________
शासनाच्या भरीव कामगिरीची माहिती मिळाली: संजय कदम, नागरिक, 
         महाविकास आघाडी सरकारचे निर्णय व योजनांची चित्रमय प्रदर्शनातुन शासनाने केलेल्या भरीव कामगिरीची माहिती मिळाली. प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाने केलेल्या कामगिरीचा अहवाल नागरिकांसाठी अत्यंत पारदर्शकपणे सादर केला आहे. अशाच कामांचा दरवर्षी आढावा घेण्याबाबतचे मत  प्रदर्शनास भेट देणारे संजय कदम नागरिकाने व्यक्त केली.

__________
माहिती अतिशय उपयुक्त व मौल्यवान: प्रकाश सोंजे, शिक्षक
       प्रदर्शनातील माहिती अतिशय उपयुक्त व मौल्यवान आहे. विभागातील शिक्षक कर्मचाऱ्यांना योजनांच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळण्यास या प्रदर्शनाची नक्कीच मदत होणार.


      प्रदर्शनास विद्यार्थी, अल्पसंख्याक बांधव व नागरिकांनी यावेळी भेट देऊन माहिती जाणून घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे