जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमाताई हिरे
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य
समाजोपयोगी - आ. सीमा हिरे
नाशिक ( प्रतिनिधी ) जायंट्स ही सेवाभावी संघटना समाजोपयोगी सेवाकार्ये सातत्याने करते. आदर्श नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. नाशिकचे अनुपकुमार जोशी यांनी गेल्या १५ वर्षात विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांसह ते उत्तम कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील असा विश्वास आ. सीमा हिरे यांनी व्यक्त केला. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ अ च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.
आ.सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चिंतामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जायंट्स फेडरेशन २ अ चे नूतन अध्यक्ष अनुपकुमार जोशी व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी १० नेत्रहीन बांधवांना पांढऱ्या काठीचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. आ.सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात जायंट्स करीत असलेले उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सन २०२१ मध्ये ज्या ग्रुपने व सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांचा गौरव करून पारितोषिक वितरण करण्यात आले. जोशी यांनी आगामी काळात अवयवदान व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन असे अनेक उपक्रम राबवले जातील असे स्पष्ट केले. या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांसह व्यासपीठावर माजी अध्यक्ष बाबुराव बगाडे, अनुपकुमार जोशी, सुहास शुक्ल, डॉ.संतोष मिश्रा, गोविंदभाई पटेल, रवि जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर घरटे यांनी तर आभारप्रदर्शन डी.एल.जाधव यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा