नाशकात होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार ! --आर. मुरली कृष्णन, अखिल भारतीय विद्युत मजदूर संघ
अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे
१४ व १५ मे ला १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन
दोन दिवसीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार !
नाशिक : भारतीय मजदूर संघ या देशातील एक क्रमांकाच्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन १४ व १५ मे रोजी नाशिक येथे संपन्न होत असल्याची माहीती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष आर.मुरली कृष्णन, महामंत्री अमर सिंह, उप महामंत्री अरूण देवांगण, प्रभारी विद्युत क्षेत्राचे अख्तर हुसेन, केंद्रीय सचिव जयेंद्र गढवी, संघटन मंत्री विलास झोडगेकर व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एल.पी.कटकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोविड प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशास्त प्रांगणात होत असलेल्या अधिवेशनासाठी २० राज्यातील ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
१४ मे २०२२ रोजी होणार्या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य व भूतपूर्व अध्यक्ष के.के. हरदास यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल ढुमणे हे स्वागताध्यक्ष म्हणून देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करणार आहेत.
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.सुरेंद्रन, राष्ट्रीय मंत्री रामनाथ गणेशे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक असणार आहेत. भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन मंत्री सी.व्ही.राजेश, उद्योग प्रभारी अख्तर हुसेन आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्युत निगम प्रभारी एल.पी.कटकवार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन सर्वांना लाभणार आहे.
दोन दिवस चालणार्या या अधिवेशन आर. मुरलीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तर अमर सिंह साखला हे संचालन करणार आहेत. यावेळी विद्युत क्षेत्राला भेडसावणार्या समस्या, केंद्र व राज्य सरकारे घेत असलेले परस्परविरोधी निर्णय, कामगार व कामगार संघटना विरोधी पारित झालेले कायदे, शासकीय विद्युत क्षेत्राचा होत असलेला संकोच आदी विषयांवर या अधिवेशन चर्चा होऊन पुढील रणनिती निश्चित केली जाणार आहे.
विद्युत क्षेत्रापुढे येणार्या आव्हानांचा तितक्याच खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी संपुर्ण जबाबदारी युवा नेतृत्वाकडे सोपवली जाणार असून विविध प्रस्तावही यावेळी पारित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुवर्ण जयंती वर्षात संपन्न होणारे अधिवेशन घेण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे व या संधीचे सोने करण्याचा निर्धार कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव व महामंत्री अरूण पिवळ, कार्याध्यक्ष सुनिल सोमवंशी, संघटन मंत्री विजय हिंगमिरे यांनी सांगितले. अधिवेशनाची संपुर्ण जबाबदारी नाशिकच्या कार्यकर्त्यांवर सोपवली असून त्यात कुठलीही कमतरता भासणार नसल्याची माहीती अधिवेशन संयोजक विलास झोडगेकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा