जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

न्यूज मसाला वृत्तसेवा,
नासिक, 7387333801

समूह वारली चित्रप्रदर्शनाचे
रविवारी दि.१ मे रोजी उद्घाटन !

   नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल.


प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल.
        यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, पद्मजा ओतूरकर, रविंद्र वैष्णव, मंगला वाघमारे यांच्या वारली चित्रांचा समावेश आहे. पहिल्या गटाचे चित्रप्रदर्शन दि.१ ते ८ मे दरम्यान होईल. तेथेेेच दुसऱ्या गटाचे चित्रप्रदर्शन दि.१० ते १७ मे या काळात होईल. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत आपली कला पोहोचावी, त्यांना कलेचा मुक्तपणे विनामूल्य आस्वाद घेता यावा, चित्रांची विक्री व्हावी, कलाकारांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यातील कलानिर्मितीचा हुरूप वाढावा हा प्रदर्शनामागचा हेतू आहे. मुळात आदिवासी वारली चित्रकला सामुहिक असून प्रदर्शनातील सामूहिक प्रयत्नांचा सर्वांना लाभ होईल. ज्यांना वारली चित्रकला शिकायची आहे त्यांच्यासाठी तेथेच गुरुवार दि.५ ते रविवार दि. ८ पर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ५ पर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात १० ते ६० या वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. दि. १ ते ८ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत चित्रप्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. जिज्ञासूंनी ९४२२२७२७५५ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
**************************************
मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !
http://www.newsmasala.in/2022/04/blog-post_25.html
**************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !