जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल

जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल.

         नवी दिल्ली::- जलजीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये  ७०% नळाद्वारे पाणी पोहचविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एकूण १४६.०९ लाख घरांपैकी १०३.५४ लाख म्हणजे ७०.८८% घरांमध्ये  ०४ एप्रिल २०२२ रोजीपर्यंत नळाच्या पाण्याची जोडणी  पोहोचली आहे.

जल जीवन अभियान  २०१९ घोषित झाले तेव्हा महाराष्ट्रातील केवळ ४८.४४ लाख म्हणजे ३३ टक्के ग्रामीण घरात नळाच्या पाण्याच्या जोडण्या होत्या. त्यानंतर पाण्यासाठीच्या नळजोडणीत  ५५.१० लाख म्हणजे ३७.७२ टक्के घरांची भर पडली. अशी माहिती जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
*******************************
जलजीवन अभियान-
महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत नळाचे पाणी पोचवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पासून ‘जलजीवन अभियान- हर घर जल’ राज्यांसोबतच्या भागीदारीतून राबवत  आहे.
*********************************
नासिक जिल्ह्यात "जलजीवन अभियान-हर घर जल" अंतर्गत  ८७% नळाच्या पाण्याची जोडणी झाली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून देण्यात आली.
********************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !