सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्यांच्या संघटनेची पुनर्रचना !
न्यूज मसाला वृत्तसेवा,
७३८७३३३८०१
सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्यांच्या संघटनेची पुनर्रचना !
अध्यक्षपदी विश्वास रणदिवे, सचिवपदी शशिकांत सपकाळ
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार निवास येथील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या संघटनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावेळी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि मूंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभदेखील फोर्ट येथील बांधकाम भवन येथे आयोजित करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास रणदिवे आणि सचिवपदी शशिकांत सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, शाखा अभियंता व इतर वरीष्ठ पदाधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्यालय सचिव बाबाराम कदम, कार्यालय प्रमुख मनोहर दिवेकर, कार्यालय सहाय्यक कृष्णा भरडे त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा