जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान ची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन !

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी जयपूर येथे देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रादेशिक परिषद आयोजित !


जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने या प्रादेशिक परिषदेचे आयोजन !

नवी दिल्ली::-जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत भूषविणार आहेत. या प्रादेशिक परिषदेत सहभागी होणाऱ्या ८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. या परिषदेला ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० राज्यातील  जल मंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

अत्यंत महत्त्वाच्या अशा या दोन्ही सरकारी अभियानांनी प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात केलेल्या प्रगतीविषयी या परिषदेत चर्चा होऊन, यातील नियोजनबद्ध उपक्रमांना वेग आणण्यासाठी तसेच या अभियानांचा भविष्यातील आराखडा निश्चित करण्यासाठी विचार विनिमय केला जाईल. या परिषदेत सहभागी झालेल्या राज्यांच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव यांच्याशी जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान यांचे अभियान संचालक चर्चा करतील. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील अडीच वर्षांत ग्रामीण भागातील ६ कोटी १५ लाख घरांना पाणीपुरवठ्यासाठी नळजोडणी देण्यात आली असून ६ एप्रिल रोजी देशातील ९ कोटी ३९ लाख घरांमध्ये (४८.६१%) नळजोडण्या कार्यरत आहेत. आतापर्यंत, ८ लाख ५५ हजार शाळा (८३%) आणि ८ लाख ८२ हजार (७९%)अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याचा नळाने पुरवठा होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !