पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. वर्षा फडोळ मंगळवारी रुजू होणार !
न्यूज मसाला वृत्तसेवा,
7387333801
नाशिक –जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या रिक्तपदावर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांची नियुक्ती शासनाने केली असून मंगळवारी त्या पदभार घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
पाणी व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांची बदली झाल्याने आठ महीन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून २००७ मध्ये बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत डॉ. वर्षा फडोळ यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.
जळगाव जिल्हा परिषदेत परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात ह्युमन रिसोर्स विभागाच्या (एचआरडी) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. तेथील बदलीने नंदुरबार जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) या पदावर नियुक्ती झाली. पाणी व स्वच्छतेबाबत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा