"मुंबईकर" महाराष्ट्रदिनी आपल्या भेटीला ! मी मुंबईकर... मै मुंबईकर... दुनिया में कोई नहीं मुझसे बेहतर… हालात हों जैसे भी मै सिकंदर... !!
न्यूज मसाला वृत्तसेवा,
नासिक
‘मुंबईकर’ महाराष्ट्रदिनी मुंबईकरांच्या भेटीला !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'मुंबईकर’ ही मुंबईत राहणार्या माणसाला अभिमानास्पद अशी पदवीच वाटते. सार्या भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी ही ओळख ठळकपणे आपलं अस्तित्व दाखवते. मुंबईचं श्रीमंतीचं, ग्लॅमरचं वलय आपसुक मिळत असलं तरी, मुंबईकर हा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख असलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं वर्णन करणाऱ्या ‘मुंबईकर’ या हिंदी गाण्याचा म्युझिक व्हिडिओ १ मे या महाराष्ट्रदिनी रसिकांसमोर मिथिलेश पाटणकर या यूट्यूब चॅनेलवर आणि ऑडिओ इतर सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॅार्मस् वर प्रसिद्ध होत आहे.
या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार डॉ. प्रमोद बेजकर आहेत. मिथिलेश विश्वास पाटणकर यांनी या गाण्याचं संगीत संयोजन आणि गायन केलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक रॅप गाण्याचा भाग आहे, जो मिथिलेश यांनीच लिहिला असून, एका वेगळ्याच शैलीदार आवाजात गायला आहे. या गाण्याच्या व्हिडिओत, मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली अनेक स्थळं पहायला मिळतील.
तसंच मुंबईत विविध व्यवसाय करणारे देखिल आपण मुंबईकर असल्याचं अभिमानाने गाताना दिसतील. या गाण्यातील रॅप भाग नील मिथिलेश पाटणकर याने जोमदारपणे सादर केला आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची आहे. या व्हिडिओचं चित्रीकरण स्मित वैद्य आणि भूषण जाधव यांनी केलं असून व्हिडिओची संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन विदित मिथिलेश पाटणकर याने केलं आहे. मुंबईची सैर घडवणारा हा व्हिडिओ देखणा झाला आहे. या म्युझिक व्हिडीओ मध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मढ मार्वे समुद्र किनाऱ्या पर्यंत ४५ स्थळांवर चित्रिकरण करण्यात आले आहे तसेच डॉक्टर, शिक्षक, सफाई कर्मचारी, रिक्षावाला, टॅक्सीवाला, पानवाला अशा साधारणतः ३५ व्यावसायिक
लोकांना या गाण्यातील ओळी गाताना दाखविण्यात आले आहे.

गाण्याबद्दल सांगताना डॉ. प्रमोद बेजकर म्हणाले की, ’मुंबईकर' हे वेगळंच रसायन आहे. कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारा, नेहमीच आनंदात राहणारा, सर्वांना आपलंसं करणारा मुंबईकर हा एक लाघवी माणूस आहे. मुंबईत, सर्व धर्म आणि भाषा यांचा गोपालकालाच झाला आहे आणि या गोपालकाल्यावर वाढलेला, मुंबईकर कधी कोत्या मनाचा झाला नाही. मुंबईकरांचं हे लोभसपण गाण्यात यावं असं मला वाटत होतं. ते मी माझ्यापरीने या गाण्यात मांडायचा प्रयत्न केलाय. मी संगीतकार नसलो तरी मला या गाण्यासाठी चाल सुचली. मिथिलेश सारख्या, संगीत पारंगत आणि गुणी कलाकाराचा सहभाग असल्यामुळेच या गाण्याला आहे ते मूर्त स्वरूप मिळालं आहे. मुंबईकर नसलेल्यांना देखील हे गाणं आपलंसं वाटावं.
मिथिलेश पाटणकर या गाण्यासंदर्भात म्हणाले की, प्रत्येक शहरात राहणाऱ्या व्यक्तीला त्या शहराचा अभिमान असतो म्हणूनच 'पुणे तिथे काय उणे' असं पुण्यात म्हटलं जातं किंवा 'जगात जर्मनी भारतात परभणी' असं परभणीकर म्हणतात... तर तसंच या गाण्यात डॉ. बेजकर म्हणतात की, मी मुंबईकर... मै मुंबईकर... दुनिया में कोई नहीं मुझसे बेहतर… हालात हों जैसे भी मै सिकंदर... हे गाणं म्हणजे डॉ. प्रमोद बेजकर यांनी श्रोत्यांना आणि दिग्दर्शक विदित पाटणकर याने प्रेक्षकांना घडवलेली मुंबईची आनंदयात्राच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा