अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल !


न्यूज मसाला वृत्तसेवा,
7387333801

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल !

  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरेबाळासाहेब कर्डकअंबादास गारूडकर, अॅड. सुभाष राऊततुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी !

 

       नाशिक, दि. २ एप्रिल :- राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरेबाळासाहेब कर्डकअंबादास गारूडकरअॅड.सुभाष राऊततुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी लावण्यात आली आहे.


            अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणी बाबत चर्चा होऊन कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.


           अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत करण्यात आलेल्या बदलानुसार प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकजळगावधुळे, नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्याकडे कोकण विभागातील ठाणेपालघरनवी मुंबईरायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारूडकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणेअहमदनगरसोलापूरसातारासांगली व कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


त्याचबरोबर
 प्रदेश उपाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्याकडे मराठवाडा विभागातील औरंगाबादजालनाबीडपरभणीलातूरहिंगोलीनांदेडउस्मानाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम बिडकर यांच्याकडे विदर्भ विभागातील अमरावतीअकोलायवतमाळबुलढाणावाशीमची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्याकडे नागपूर विभागातील नागपूरवर्धाचंद्रपूरभंडारागोंदिया व गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !