अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. च्या अध्यक्षपदी निवड !

न्यूज मसाला वृत्तसेवा,.                                    
डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. अनिल आव्हाड यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई हाजीअली येथील "आय एम ए हाऊस" येथे संपन्न झाला. आय एम ए दिल्लीचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयेश लेले हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल आव्हाड यांनी त्यांच्या पुढील वर्षातील योजनांबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, डॉक्टरांचे वैयक्तिक आरोग्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचे महत्त्व ओळखून ते उत्तम राखण्यासाठी नवीन योजना आखणे, डॉक्टरांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे; ज्यामध्ये वेगवेगळे खेळ, संगीत आणि पर्यटन याचा समावेश असेल असे विविध कार्यक्रम राबविण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
सदर सोहळ्यास मुंबई शहरातील अनेक नामांकित डॉक्टरांनी आपली उपस्थिती दर्शविली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !