सर्वव्यापी संख्याशास्त्राचा अभ्यास करा - डॉ. व्हि.एन शिंदे
कवठेमहांकाळ ३१(प्रतिनिधी):: शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील, महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पदार्थ विज्ञान आणि जैवशास्त्रामध्येही सांख्यिकीय पद्धतींचा अवलंब मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमाअंतर्गत आर.आर.पाटील महाविद्यालय सावळज आणि पी.व्ही.पी. महाविद्यालयाने प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजित केलेल्या एक दिवशीय कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून डॉ. व्ही. एन. शिंदे महाविद्यालयात आले होते. यावेळी त्यांनी सर्व विभागांना भेटी दिल्या. नव्यानेच सुरु झालेल्या संख्याशास्त्र विभागाची संगणकयुक्त प्रयोगशाळा, विद्यार्थी संख्या तसेच पुरेसा शिक्षक वर्ग पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एम.के. पाटील, संख्याशास्त्र विभागातील प्रा. विजय कोष्टी, प्रा. अभिलाष पाटील, प्रा. गणेश सातपुते, प्रा. शुभांगी भोसले उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा