शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा मान्यवरांच्या हस्ते प्रदान
न्यूज मसाला वृत्तसेवा
दांडेकर दीक्षित तालीम संघाच्या वतीने शिंमगा कुस्ती दंगल निमित्ताने क्रीडा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न."
शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा प्रदान !
नासिक (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला १६५ वर्षांची परंपरा लाभलेला नासिक शहरातील दांडेकर दीक्षित तालीम संघाचा शिमगा कुस्ती दंगल पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे स्पर्धा व पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते, चार वर्षांपूर्वी त्यात नविन प्रथा सुरू झाली आहे.
कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, कामगिरी करणाऱ्या जुने पहीलवान कुस्तीगीर कुस्ती प्रेमी यांची निवड करुन त्यास शिमगा कुस्ती दंगल मध्ये आमंत्रित करून,
नासिक शहर जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष खासदार आमदार क्रीडा महर्षी कै. उत्तमराव ढिकले यांचे नावाने क्रीडा महर्षी उत्तमराव ढिकले क्रीडा गौरव पुरस्कार बहाल करण्यात येतो. सन २०२२ चा पुरस्कार जुने कुस्तीगीर व नासिक शहर तालीम संघाचे माजी अध्यक्ष पहीलवान काका साहेब खंडेराव मुळाणे यांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. तसेच मानाची गदा ग्रामीण भागात कुस्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले व पहीलवान गौळाणे गावचे कुस्ती पोशिंदे माजी नगरसेवक व नासिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना महाराष्ट्र चॅम्पियन कै. पिंटू तांबोळी यांचें नावाने दिली जाणारी मानाची गदा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नासिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण होते, याप्रसंगी उल्हास धनवटे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य व दांडेकर दीक्षित तालीम संघाचे अध्यक्ष पै. हिरामण वाघ , उपाध्यक्ष खंडू बोडके, उपाध्यक्ष वाळू नवले, विल्होळीचे उपसरपंच भास्कर थोरात, सारुळचे सरपंच सदानंद नवले, शहरतालीम संघाचे उपाध्यक्ष अविनाश फडोळ, शरद प्रभाणे, कादीर पहेलवान, राजु कालेकर, संघाचे कार्याध्यक्ष सर्जेराव वाघ, कृणाल गोसावी, वस्ताद हिरामण चौधरी, ज्ञानेश्वर बेंडकूळे, पप्पू मोगरे, छोटे पहिलवान प्रतापराव वाघ, चैतन्य शेलार, ओमकार सानप, आदित्य वाडीले, मानस पहिलवान, सर्वेश्वर थापेकर, प्रथमेश सिन्नरकर, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर कोरडे, वीर मुळाणे आदी मान्यवर, कुस्तीगीर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा