३२ विदेशी भाषेत भाषांतरित झालेली "पोरी शाळेत निघाल्या" या कवितेचे कवी गणेश आघाव यांनी "कवी आपल्या भेटीला" कार्यक्रमाद्वारे ऐकविल्या कविता !


न्यूज मसाला वृत्तसेवा, 
7387333801

कवी गणेश आघाव यांनी विद्यार्थ्यांना ऐकवल्या कविता
 पुणे २९(प्रतिनिधी)::-येथील महात्मा फुले विद्यालय, उमरखेड येथे विद्यार्थ्यांसाठी 'कवी आपल्या भेटीला' या कार्यक्रमात कवी गणेश आघाव यांनी विद्यार्थ्यांना "पोरी शाळेत निघाल्या", या शैक्षणिक कवितेने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी अनेक शेती मातीच्या कविता विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्रमोद देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी पी. आर. खांडरे , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरखेडचे सहाय्यक व्यवस्थापक कैलास बोईवार, एड. भक्ती चौधरी याही उपस्थित होत्या.
              महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात नवोपक्रम या सदराखाली विद्यालयांमध्ये संपन्न झाला. या उपक्रमामध्ये जवळपास ९९ विद्यार्थ्यांनी काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक चिन्मय संजय कदम ₹१००१ रुपये तर द्वितीय कु. दुर्गेश्वरी संतोष जाधव हिस ₹७०१ व तृतीय क्रमांक कु. रीता सिद्धार्थ मुनेश्वर हिस ₹५०१ बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्टेट बँकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक कैलास बोईवार यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 
            सावळी खुर्द जिल्हा हिंगोली येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक गणेश आघाव यांनी साहित्यातील भरीव कामगिरी केली आहे.
          गणेश आघाव हे शेतकरी असून कवी देखील आहेत. "बाभळीची फुलं" हा त्यांच्या गीतांचा अल्बम हिंगोली येथे लाॅन्च झाला आहे. ऑरेंज म्युजिक प्रस्तुत, मुंबई व गायक संदीप भुरे, तसेच स्वतः गणेश आघाव यांच्यादेखील आवाजात काही गाणी आहेत. या अल्बम मधील "अशी बैल गुणवान" हे गीत १६ तासांत तब्बल ११ लाख जनतेच्या पसंतीस उतरले आहे.
          तसेच पोरी शाळेत निघाल्या ही मराठी कविता आजपर्यंत ३२ विदेशी तर भारतातील सर्व बोली भाषांमध्ये अनुवादीत झाली आहे. ही कविता सौदी अरब येथील एका नामवंत मॅगझिनमधे प्रकाशित झाली आहे. "पोरी शाळेत निघाल्या" ह्या मराठी कवितेचा जपानी भाषेतील अनुवाद जपानच्या विद्यापीठात दाखल झाला आहे.
         हिंगोली येथील कवी गणेश आघाव हे नाव आता सातासमुद्रापार पोहोचलेलं आहे. व्यवसायाने हे शिक्षित शेतकरी असून अस्सल गाव मातीतल्या सुख दुःखांना आपल्या शब्दात मांडत आहेत. शेती मातीत राबणाऱ्या शेतकर्‍यांच्या कहाण्या ते शब्दात ओतप्रोत मांडत असतात. 'मातीच्या कविता', 'कणसांच्या कविता', 'मातीला फुटले हात', 'श्वेदगंध' 'आघाववाडीची गाणी' इत्यादी कवितासंग्रह आणि 'पाऊसपाणी' हा कथासंग्रह प्रकाशित आहे. कवी गणेश आघाव हे 'गायक, गीतकार' म्हणून सर्वांना परिचित होत आहेत. 
          या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ कवी डॉ. रवींद्र चव्हाण, पर्यवेक्षक दिलीप सुरते, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पेंदे मॅडम, एडवोकेट भक्ती चौधरी, कुसुमताई गिरी, चंदाताई देशमुख, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. काव्य बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कविता उत्कृष्टपणे म्हणून दाखविल्या. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.       
         प्रास्ताविक पांडुरंग कानकाटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. डी. शिंदे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !