राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा ! जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा !
जिल्हा परिषद मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर सन्मानित !
नासिक(प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना आज जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यकर उपायुक्त, वस्तू व सेवाकर विभाग मुंबई चे संजय पोखरकर, आयमाचे सचिव तथा उद्योजक गोविंद झा, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई जयंत गायकवाड, सी.आर.पी.एफ. शहीद शिवराज शंकर चव्हाण यांच्या वीरपत्नी विमल चव्हाण, मा. नगरसेविका श्रीमती वत्सलाताई खैरे, विधानसभा सदस्य अॅड. श्रीमती हुसनबानो खलिफे, जलसंधारण अधिकारी मालेगाव अंकीता वाघमारे, मा. स्थायी सभापती अमोल जाधव, डॉ.अतुल वडगांवकर, अॅड. अनिलराव कासार या मान्यवरांना जाणीव पुरस्कार आज कालिदास कलामंदिर येथे प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यवर सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ स्मिता देशमुख, नासिक मनपा माजी उपमहापौर भिकूताई बागूल, डॉ. स्वप्निल बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे, जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, औषध निर्माण अधिकारी तथा कवी जी. पी.खैरनार, किशोर गव्हाळे उपस्थित होते. संस्थेकडून सतत सामाजिक कार्य केले जाते, आजपर्यंत ४५० विधवांना योग्य जोडीदारासोबत पुन:र्विवाह करून त्यांना सामाजिक स्तरावर आत्मसन्मान देण्याचे कार्य केले आहे, रक्तदान, अन्नदान, गरजूंना मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा