"हे फाऊंडेशन" च्या रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ चे मानकरी ! मिस रेन्बो आणि मिस्टर रेन्बो कोण ठरले ?
"हे फाऊंडेशन" च्या रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ चे बियोन्से आणि अंश तिवारी ठरले मानकरी !
न्यूज मसाला वृत्तसेवा,
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "हे फाऊंडेशन" च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ च्या दिमाखदार स्पर्धेत बियोन्से हिने मिस रेन्बो तर अंश तिवारी याने मिस्टर रेन्बोचा किताब पटकावला. व्हिक्टोरिया तेयिंग उपविजेती तर मोहित आगरवाल उपविजेता ठरला. मिस्टर क्वीन रेन्बो प्राईड ऑफ इंडियाचा मानकरी समीर शेख तर उपविजेता सय्यद याह्या ठरला.
"हे फाऊंडेशन" च्या संस्थापिका डॉ. संगीता पाटील आणि संचालिका तसेच मिस इंडिया ग्लोबल ब्यूटीच्या विजेत्या लावण्या पाटील यांनी या सौंदर्यस्पर्धेचे शानदार आयोजन केले. प्रसिद्ध दंतवैद्यक आणि फॅशन मॉडेल डॉ. सुमाया रेश्मा यांचीही यावेळी उपस्थिती होती.
या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. संगीता पाटील यांनी सांगितले की, हा उपक्रम एलजीबीटी कम्युनिटीबाबत समाजात जागरूकता व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेताना समाजाची मानसिकता त्यांच्यासाठी अनुकूल असावी, हाही त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगारा चेही मार्ग उपलब्ध करण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा दादा यांनी केले. कार्यक्रमास देशभरातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा