५७५ ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून ५५ कोटी रुपयांचे वितरण !!


न्यूज मसाला वृत्तसेवा,

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पेसा ५% अबंध निधीचे जिल्हास्तरावरून ५५ कोटी ८६ लक्ष वितरण !

          नाशिक - सन २०२१-२२ वर्षात आदिवासी बहुल ९ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०२१-२२ अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , नाशिक द्वारा  जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे कडील निधी वितरण आदेशानुसार एकत्रित प्राप्त निधी  ५५ कोटी ८६ लक्ष २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या प्रमाणात निधी थेट पेसा ग्रामपंचायतीना वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. नाशिक जिल्हातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% अबंध निधी योजनेचा निधी  २४ मार्च २०२२ रोजी थेट ग्रामपंचायतींना वितरित होत असुन यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असुन १४७९ गावांना या निधीचा लाभ होणार आहे. या योजनेत ग्रामपंचायतींच्या खात्यात ZPFMS प्रणालीद्वारे थेट निधीचे वितरण केले गेले. सदरचा निधी संबंधित ग्रामपंचायतीने त्या अंतर्गत येणार गाव, वस्ती, वाडी, पाडा यांच्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेला निधी बाबनिहाय खर्च करतांना
अ) पायाभूत सुविधा
ब) वन हक्क अधिनियम (FRA ) व
पेसा कायद्याची अमंलबजावणी
क) आरोग्य,स्वच्छता, शिक्षण व
ड) वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका या बाबीं करीता प्रत्येकी १/४ या प्रमाणात विनियोगात आणावा असे शासन आदेश आहेत.                 
        जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याबाबत माहिती दिली असून संपूर्ण निधीचा योग्य विनियोग कसा होईल याबाबत नियोजन करण्याचे आदेश पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निर्गमीत केले.
*******************************
        "पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना प्राप्त होणारा निधी हा आदिवासी जनतेच्या कल्याणाकरिता खर्च करण्यात येईल याबाबत ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करावे व पेसा ग्रामपंचायतीने त्या अंतर्गत येणाऱ्या पेसा गावांच्या २०११ च्या जनगणनेतील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार त्या प्रमाणात हा निधी खर्च करत या भागातील पायाभूत विकासकामांना गती द्यावी असे आदेश ग्रामपंचायत विभागास देण्यात आले आहेत."
                                   -लीना बनसोड, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,
                                    जि.प. नाशिक
*********************************

तालुक्यानुसार खालीलप्रमाणे निधी-
१) नाशिक
ग्रामपंचायत संख्या - ३२
पेसा गावे - ४९
प्राप्त निधी - ३,००,०५,३५६/-
२) इगतपुरी
ग्रामपंचायत संख्या - ६४
पेसा गावे - ११८
प्राप्त निधी - ४,४८,६१,३५२/-
३) त्र्यंबकेश्वर
ग्रामपंचायत संख्या - ८४
पेसा गावे - ११८
प्राप्त निधी - ७,९२,३६,०५०/-
४) पेठ
ग्रामपंचायत संख्या - ७३
पेसा गावे - २०८
प्राप्त निधी - ६,७९,८४,३४४/-
५) सुरगाणा
ग्रामपंचायत संख्या - ६१
पेसा गावे - २७८
प्राप्त निधी - १०,१२,८३,५९६/-
६) दिंडोरी
ग्रामपंचायत संख्या - १०४
पेसा गावे - १९३
प्राप्त निधी - ९,३३,२०,९१६/-
७) कळवण
ग्रामपंचायत संख्या - ८६
पेसा गावे - २०१
प्राप्त निधी -८,४८,५०,०४२/-
८) बागलाण
ग्रामपंचायत संख्या - ४९
पेसा गावे - ७४
प्राप्त निधी -४,७३,६१,५९९/-
९) देवळा
ग्रामपंचायत संख्या - २२
पेसा गावे - २९
प्राप्त निधी -९७,१६,७४५/-

एकूण
ग्रामपंचायत संख्या - ५७४
पेसा गावे - १४७९
प्राप्त निधी -५५,८६,२०,०००/-

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !