शिवजयंती निमित्ताने ५१ युवकांचे रक्तदान तर ३५० नागरीकांची आरोग्य तपासणी !!
न्यूज मसाला वृत्तसेवा
शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चिल्ड्रन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन, आर.एम.एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसीयू, आयसीसीयू लाईफ मोनीटर्ड वेल व सायन हॉस्पिटल ब्लड बँक व मराठे शाही ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, गोवंडी येथील इमारत क्र. १७ ब, संस्कृती सोसायटी, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे संपन्न झाले.
मराठे शाही ग्रुप व स्थानिक नागरिकांनी मिळून एकंदरीत ५१ युवकांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरात ३५० नागरिकांनी, डोळे तपासणी, ईसीजी, शारीरिक तपासणी करून घेतली.
मराठे शाही ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदी वातावरणात शिबिर संपन्न केले. या शिबिराला, विशेष सहकार्य रक्तदान दाते, साई भाई रामपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच संजय इंदप यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा