मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि मै ‘इश्‍क’भी लिखना चाहूँ, तो ‘इन्कलाब’ लिखा जाता है !!


न्यूज मसाला वृत्तसेवा,

          (प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक, कवठेमहांकाळ)

                    दि. २३ मार्च; क्रांतिकारक भगतसिंगराजगुरु व सुखदेव यांचा स्मृतिदिन आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या जादूई काळात संपूर्ण पिढीच देशभक्तीने भारावली होती. त्या मंतरलेल्या दिवसात १९०७ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका क्रांतिकारी तरुणाने  अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. हा तरूण म्हणजेच  हसत हसत मृत्यूला कवटाळणारा आणि भीतीवर विजय मिळविणारा भगतसिंग होय. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पोलिसी अत्याचारांविरुद्ध आंदोलन करून ‘ चौरीचौरा’ येथील पोलीस चौकी जाळली. त्यानंतर लाल लजपतराय यांच्यावर लाठीमार करणाऱ्या जेम्स स्कॉट ऐवजी चुकून केलेली सॅडर्स ची हत्याअसेम्ब्लीतला  बॉम्बस्फोट बॉम्ब बनविण्याची केंद्रे आदी घटनांबाबत त्यांना दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली व तुरुंगात छळ केला. शेवटी २३ मार्च १९३१ रोजी त्यांना आणि त्यांचे सहकारी राजगुरु व सुखदेव यांना  सॅडर्सच्या खुनाबद्दल फाशी देण्यात आली. मित्राला लिहिलेल्या एका पत्रात भगतसिंगने लिहिले  होते की, ‘मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि मै ‘इश्‍क’भी लिखना चाहूँ, तो ‘इन्कलाब’ लिखा जाता है.’ (माझी लेखणी माझ्या भावनांशी एवढी एकरूप झालेली आहे की मला ‘प्रेम’ असं लिहायचं असलं, तरी कागदावर ‘क्रांती’  असा शब्द उमटतो!)’’. केवढे हे जाज्वल्य देशप्रेम.  या निमित्ताने तरुणांनी भगतसिंगाच्या शौर्याचीबलिदानाची आणि जाज्वल्य देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।