राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ उत्साहात साजरा !
राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ उत्साहात साजरा !
पुणे(प्रतिनिधी)::- सक्षम पोलीस टाइम्स व सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सोहळ्यात प्रमुख पाहुणे उल्हासदादा पवार, माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यीक मोहन जोशी, अभिनेत्री निशा परुळेकर, भाजपा पदाधिकारी सविता जामनिक, कॉर्डिनेटर किसान सेल भारत, तथा अंबिका मसाले संचालक, जेष्ठ समाजसेविका कमलबाई परदेशी उपस्थित होते.
याप्रसंगी पुस्तक प्रकाशन शुभहस्ते - सुनीताताई राजे पवार, कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या शुभहस्तेहस्ते पु्स्तक प्रकाशन करण्यात आले.
सुजाता ताई कमलकृष्ण, सदस्य सावित्रीबाई फुले मराठी अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सक्षम महिला रत्न पुरस्कार २०२२ सोहळा उत्साहात पार पडला.
पुरस्कार्थी म्हणून माधुरी मुरारी मडावी, (मुख्याधिकारी यवतमाळ नगरपरिषद),
डॉ. रुपाली भुजंगराव मेमाणे (लेखन),
नलिनी प्रफुल्ल लांजेवार (व्यवसाय ट्रेनर),
तजेला बगाडे, (मराठी चित्रपट निर्मिती),
उज्ज्वला जितेंद्र गौड (सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक), सोनाली गौतम थोरात (व्यवसाय निर्मिती मार्गदर्शन), कल्पना कांतीलाल शर्मा (उद्योजिका), ज्योती महेंद्र चौधरी, (अंगणवाडी सेविका), सुवार्ता सुधाकर धिवरे (शिक्षिका),
पूजा मयूर वाणी, (शिक्षण व सामाजिक कार्य),
भाग्यश्री कुणाल देवरे, (बालसाहित्य लेखिका व प्रकाशक), डॉ. संगीता दिगंबर नांदुरकर, (मुख्याधिकारी येवला नगरपरिषद), वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पोलीस कॉन्स्टेबल), शुभांगी पाटील (शिक्षण क्षेत्र), प्रिया वसावे (पोलीस कॉन्स्टेबल), सुलोचना गंगाराम आवारे (राजकीय क्षेत्र), संगीता अरुण पाटील, (श्री साई बहुउद्देशीय सामाजिक संस्था), शिवराई ज्ञानेश्वर भोसले (आदर्श माता), रूपल विश्वास गुजराथी (कोरोना योद्धा व आदिवासी मुलांसाठी कार्य), शैला सुनील उपाळे, (नगरसेविका दिंडोरी) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक मुख्य संपादक विलास पाटील, उपसंपादक नित्यानंद पाटील, निवासी संपादक ज्योती रामोले, निवासी संपादक, उपसंपादक विवेक सिंग सिसोदिया, उप संपादक प्रवीण पवार, कार्यकारी संपादक सुनील निकम, पश्र्चिम महाराष्ट्र सह संपादक विनोद शिंदे, पश्र्चिम महाराष्ट्र कार्यकारी संपादक संपादक मिलिंद गायकवाड, धुळे नंदुरबार प्रतिनिधी महेंद्र चौधरी, उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी महेंद्र पाटील, राष्ट्रीय चीफ ब्युरो सुनील झा, नासिक शहर प्रतिनिधी योगेश घोलप तसेच महाराष्ट्र चीफ ब्युरो, जिल्हा प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, व्यवस्थापक आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा