सुभाषित दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार जाहीर !


सुभाषित दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार जाहीर !

   नाशिक-(वार्ताहर) अक्षरमंच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नाशिकच्या सुभाषित या विनोदी दिवाळी अंकाला अक्षरगंध पुरस्कार प्राप्त झाला आहे. अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी हे पुरस्कार जाहीर केले.
स्पर्धेतील अक्षरगंध पुरस्कार सुभाष सबनीस संपादक असलेल्या सुभाषित दिवाळी अंकाबरोबरच वेदांतश्री, रयतेचा कैवारी चांगुलपणाची चळवळ, वयम्, ठाणे नागरीक, दिपोत्सव निर्धाराचा. कल्याण वैभव, डॉक्टरुग्णमित्र या दिवाळी अंकानाही अक्षरगंध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती 'अक्षरमंच'चे अध्यक्ष डॉ.योगेश जोशी आणि सचिव हेमंत नेहते यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी