पर्यटन संचालनालयातर्फे पक्षी महोत्सव ! हौशी, जिज्ञासू, विद्यार्थी यांच्यासाठी पक्षी महोत्सव, पर्यटन महोत्सव, ग्रेप हार्वेस्टिंगची पर्वणी !!




पर्यटन संचालनालयातर्फे 
नांदूर मध्यमेश्वर पक्षी महोत्सव

        नाशिक ( प्रतिनिधी ) :- विभागातील पर्यटन उपसंचालक कार्यालयातर्फे येत्या ५ व ६ मार्च रोजी नांदूर मध्यमेश्वर येथे पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पक्षी निरीक्षणासह  विविध उपक्रम होतील. याशिवाय विविध चर्चासत्रे होणार आहेत असे उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
          दि. ५ मार्च रोजी सकाळी सायकलवर नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर पक्षी - फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पक्षी महोत्सवाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ पक्षी निरीक्षक व अभ्यासक दत्ता उगांवकर यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. चर्चासत्रांमध्ये  ज्येष्ठ पक्षी निरीक्षक सतीश गोगटे, प्रशांत वाघ, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर आणि प्रा.डॉ. सुधाकर कुऱ्हाडे,  नाशिकच्या पक्षी मित्र मंडळाचे पदाधिकारी अनिल माळी, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या प्रतीक्षा कोठुळे, कृषी पर्यटन तज्ज्ञ हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या महोत्सवात फोटोग्राफी स्पर्धा होईल. चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यात शालेय विद्यार्थी तसेच कला महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. यावेळी स्थानिक शेतकरी व आदिवासींनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री  केली जाईल. पोवाडा गायन, पथनाट्ये, आदिवासी कलाकारांचे सोंगी लोकनृत्य यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी होऊन भरगच्च कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
        मार्च महिन्यातच भंडारदरा येथे पर्यटन महोत्सव होणार आहे. तसेच नाशिकच्या गंगापूर धरणाजवळ ग्रेप पार्क रिसॉर्टमध्ये ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टिव्हल होणार आहे. शाश्वत पर्यटन विकासासाठी  संचालनालय कटिबद्ध असून नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे  पर्यटकांना आकर्षित करतात. कृषी पर्यटनाला अधिक चालना मिळाली पाहिजे असेही मधुमती सरदेसाई -राठोड यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !