प्रथमेश पुंडेने स्वत:च्या रक्ताने लिहिलेले पत्र आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांना आझाद मैदानावर देणार ! खालील लिंकवर क्लिक करून पाहा पत्रातील मजकूर !!


निशब्द
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २६ तारखेला छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या महाराष्ट्रातील मराठ्यांचं छत्रपती घराण्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिकच समजावे, संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करंजाडे शहरातील प्रथमेश पुंडे या तरुणाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले असून आज आझाद मैदानावर येऊन संभाजीराजेंना ते पत्र देणार आहे.
       पत्रात प्रथमेश लिहीतो की,

                दि. २५/०२/२०२२
             !! जयस्तू मराठा !!
       !! एक मराठा लाख मराठा !!
प्रती,
युवराज संभाजीराजे छत्रपती,
विषय:- दि. २६ फेब्रु. पासून आझाद मैदान, मुंबई येथील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा,,,
महाराज साहेब,
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणी साठी उद्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणास बसत आहेत,
जून २०२१ च्या राज्यसरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या परंतु त्याची  अंमलबजावणी केली नाही.
       सर्व शिफारशींची अंमलबजावणी लवकरात लवकर करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी.
            मराठा आरक्षण व इतर प्रमुख मागण्यासाठी खा. संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा.
      हुकुम केल्यास प्राण अर्पण करू.
        जय हिंद
      जय महाराष्ट्र               
                   श्री. प्रथमेश भास्कर पुंडे
          राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग,नगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !