केंद्रीय राज्य अर्थमंत्री यांच्याशी रविवार २७ फेब्रुवारी रोजी संवाद बैठक.


केंद्रीय
राज्य अर्थमंत्री यांच्याशी रविवार २७ फेब्रुवारी रोजी नासिक सीए शाखेत संवाद बैठक.

    नासिक::- दि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, नाशिक येथे दि. २७ फेब्रुवारी, २०२२ (रविवार) रोजी दुपारी ०३ ते ०५.३० च्या दरम्यान नाशिक ICAI शाखेत राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची नाशिक चे औद्योगिक संस्था निमा, आयमा, टीपीए महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स, बँकर्स असोसिएशन, सीआरईडीएआय, बिल्डर्स असोसिएशन, लघु उद्योग भरती, इमा, सीएस, सीडब्लूए या संस्थांशी संवाद बैठक होत आहे.  या बैठकीत डॉ. भागवत कराड बजेट २०२२ आणि नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रातील नवीन विकासाबाबत चर्चा करणार आहेत.
       या संवाद बैठकीत नाशिक मधील जास्तीत जास्त सीए सभासदांनी आपला सहभाग नोदवून मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन आय.सी.ए.आय, नाशिकचे अध्यक्ष सोहिल शाह, उपाध्यक्ष  राकेश परदेशी, सचिव संजीवन तांबूळवाडीकर, खजिनदार जितेंद्र फाफत, अभिजित मोदी, मनोज तांबे, विशाल वानी व  पियुष चांडक यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !