मधुबाला,,,,,,,दि ब्युटी विथ ट्रजेडी ! २३ फेब्रुवारी स्मृतीदिनानिमित्त,,,,,,,,.




दि ब्युटी विथ ट्रजेडी

   

२३  फेब्रुवारी, स्वर्गीय लावण्यवती मधुबालाचा स्मृतिदिन. प्रेमाचे प्रतीक असलेल्या 'व्हॅलेंटाइन डे' दिवशी ३६ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर केवळ नऊ दिवसांनी मधुबालाचे जाणे अत्यंत दुर्दैवी होते. जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याविषयी चर्चा रंगते तेव्हा मधुबाला हे नाव अग्रस्थानी असते. मधुबाला ही हिंदी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्रीच नव्हती तर ती भारतीय सौंदर्याचा मापदंड होतीजाणकारांच्या मते तिच्याइतकी सुंदर अभिनेत्री तिच्या आधीही व तिच्यानंतरही हिंदी चित्रपट सृष्टीत झाली नाही.  

अलौकिक सौदर्याचे देणं लाभलेल्या आणि विलक्षण अभिनय क्षमतेच्या मधुबालाने 'बॉम्बे टॉकीज' च्या  ‘बसंत’ (१९४२) या चित्रपटातून ‘बेबी मुमताज’ या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. याच चित्रपटात 'मेरे छोटेसे मनमे छोटीसी दुनिया रे' हे गाणं पडद्यावर गाऊन भरपूर टाळ्याही घेतल्या होत्या. 'बसंत' नंतर सहा चित्रपटांतून तिने 'बालकलाकार' म्हणून काम करताना आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. बेबी मुमताजचं सौंदर्य पाहून अभिनेत्री देविकाराणी फारच प्रभावित झाल्या आणि त्यांनी तिचे नाव बदलून मधुबाला ठेवले. तथापि, १९४७ ला प्रदर्शित झालेल्या ‘नीलकमल’ या राजकपूर नायक असलेल्या चित्रपटाने तिला ‘व्हीनस ऑफ स्क्रीन’ केले आणि त्यानंतर जवळजवळ दीड दशक तिने हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करताना लोकप्रियतेचे अत्युच्च शिखर गाठले. १९४९ साली आलेल्या कमाल अमरोहीच्या 'महल' मध्ये 'आएगा, आएगा, आएगा आनेवाला' या गाण्यामुळे मधुबाला व लता मंगेशकर दोघीही प्रकाशझोतात आल्या.

मूळ नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी असलेल्या  मधुबालाचा जन्म दिल्ली येथे १९३३ साली एका पश्तून मुस्लीम परिवारात झालामधुबाला हे अयातुल्लाह खान यांच्या अकरा अपत्यांपैकी पाचवे. मधुबालाच्या जन्मानंतर एका ज्योतिषाने तिचे ‘ही मुलगी मोठी झाल्यावर देश-विदेशात ख्यातनाम होईल, अगणित संपत्ती मिळवेल पण तिचे स्वत:चे जीवन मात्र दु:खमयच राहील’, असे  भविष्य वर्तवले होते. यानंतर  मधुबालाच्या वडिलांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली. मुंबईला आल्यावर खानांनी अनेक प्रकारचे कष्ट केले, दरम्यान त्यांच्या तीन मुली आणि दोन मुले  मृत्युमुखी पडली तसेच गोदीत झालेल्या स्फोटामुळे  लागलेल्या आगीने त्यांचे घर आणि सामान जळून खाक झाले. घरातले सर्व जण तेव्हा बाहेर असल्यामुळे बचावले.

आपल्या मोहक हास्याने आणि भावोत्कट अभिनयाने तीन पिढ्यांना घायाळ केलेल्या मधुबालाने ७० हून अधिक हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारल्यामहल, बरसात की एक रात, चलती का नाम गाडी,  मिस्टर अॅंण्ड मिसेस ५५, काला पानी, मुगल-ए-आझम आदी चित्रपटातल्या  तिच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. रसरशीत आणि उत्साही सौंदर्याचं प्रतिक असलेल्या मधुबालाच्या अभिनयाचे मास्टरस्ट्रोक रसिकांच्या ह्रदयात शिल्पासारखे कोरले आहेत. मधुबालाने तत्कालीन प्रसिद्ध अभिनेते अशोककुमार, राजकुमार, दिलीपकुमार, सुनील दत्त, देव आनंद, शम्मीकपूर आदींसोबत काम केले असून गीता बाली, सुरैया, निम्मी आदी प्रसिद्ध नायिकांसोबतही अभिनय केला आहे, तर ‘महलोके ख्वाब’ या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे.

 १९५० ते १९५७ पर्यंतचा काळ मधुबालासाठी थोडासा वाईट होताया दरम्यान तिचे अनेक चित्रपट अयशस्वी झालेमात्रत्यानंतर १९५८ मध्ये आलेले फागुन’, ‘हावडा ब्रिज’, ‘कालापानी’ आणि चलती का नाम गाडी’ या चित्रपटांमुळे मधुबाला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात ल्या. ‘हावडा ब्रिज’ मधील मधुबालाने साकारलेली एका क्लब डान्सरची भूमिका फारच गाजलीया चित्रपटातील तिच्या अदांनी प्रेक्षक घायाळ झाले होतेतर यानंतर आलेल्या चलती का नाम गाडी’ सिनेमात आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. मधुबाला आणि दिलीप कुमार ही जोडी प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंत केलीतराना चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील प्रेमाचे सूर जुळू लागले होतेतथापि मधुबालाचे वडील अयातुल्लाहखान यांना हे प्रेम मान्य नसल्याने ते पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत्यानंतर   मुगल--आझम चित्रपटाच्या चित्रीकरणा वेळी  मधुबालाची तब्येत फार बिघडलीआपल्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी राखण्यासाठी मधुबाला घरात उकळलेल्या पाण्याशिवाय काहीच खातपित नव्हतीमात्र  जैसलमेरच्या वाळवंटातील चित्रीकर तिला मानवले नाहीशिवाय मधुबालाच्या शरीरावर जड लोह्याचे साखळदंडही लादण्यात आले होतेमात्र या पूर्ण काळात मधुबालाने एकदाही तक्रार केली नाही आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.

१९६० मध्ये मुगल--आझम  प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासूनच दर्शकांनी मधुबालाचा अभिनय डोक्यावर घेतलाआजही मधुबालाचं नाव घेतलं की अनेकांच्या तोंडी पहिला चित्रपट मुगल--आझमच येतो६० च्या दशकात मधुबालाने चित्रपटात काम करणे फार कमी केलेचलती का नाम गाडी आणि झुमरू चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी किशोर कुमार आणि मधुबाला भावनिकरित्या फार जवळ आले होतेयाचवेळी अयातुल्लाह खान यांनी किशोर कुमार यांना मधुबाला उपचारांसाठी लंडनला जात असून परतल्यावर दोघं लग्न करू शकतात असे सांगितलेतथापि, मधुबालाला आपल्या आजाराची चाहूल लागल्याने मधुबालाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किशोरकुमार यांनी तिच्याशी लग्न केलेमात्र मधुबालाची तब्येत बिघडत गेलीयावेळी तिचे पासपोर्टझुमरूबॉयफ्रेंडहाफ तिकट(१९६१-१९६२) आणि शराबी (१९६४) हे चित्रपट प्रदर्शित झालेतथापि१९६४  मध्ये मधुबालाने पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केल्यानंतर चालाक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी ती सेटवर बेशुद्ध पडली आणि हा चित्रपट बंद करावा लागला. चित्रपट जगतातील  मधुबाला यांचा प्रवास खूप कमी काळाचा ठरला. त्या केवळ ३६ वर्षांच्या असताना २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली !!  
(संकलित)                                                     प्रा. विजय कोष्टी , कवठेमहांकाळ  (सांगली)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !