नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम !
नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम !
मुंबई ::-तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ३ मार्च पर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे. त्याचा तीव्र निषेध करत शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश येवले, प्रदेश सचिव बबन कनावजे, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली कडणे, शरद श्रृंगारे, विलास तळेकर, राजेश राणे, रमेश चौबे, अनिल कदम, सुभाष गोरेगावकर, रवी कदम, सुमीत राणे यांच्या समवेत संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी इडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात शिवडी नाका येथे जोरदार घोषणाबाजी केली.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची अटक चुकीची असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीच्या या भूमिकेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा