एन.के.जी.एस.बी. निवडणूकीत आशिर्वाद पॅनलला मराठा समाजाचा पाठिंबा ! हिंद मराठा महासंघ आणि मराठा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हाती घेतलेल्या कार्याच्या अनुषंगाने......
एन.के.जी.एस.बी. निवडणूकीत आशिर्वाद पॅनलला मराठा समाजाचा पाठिंबा !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हिंद मराठा महासंघ आणि मराठा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र भर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा त्या दृष्टीने समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करावे यासाठी संघटनेने मोठ्या प्रमाणात कार्य हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना त्वरित कर्ज मंजुरी मिळावी, तसेच अनेक बँकांशी देखील मराठा समाजातील व्यावसायिकांना व्यावसायिक कर्जे देण्यास पुढाकार घ्यावा यासाठी बोलणी सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश मिळत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून एन.के.जी.एस.बी. बँकेच्या संचालक पदाची निवडणूक आहे. यामधील आशिर्वाद पॅनलचे उमेदवार प्रेमानंद शानबाग, संदेश मणेरीकर, अनंत पै, अॅड. सबनीस, नरसिंह पाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे पॅनल निवडून आल्यास, शासकीय नियमांच्या अंतर्गत जास्तीत जास्त मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
हिंद मराठा महासंघ आणि मराठा सामाजिक संस्था यांच्या वतीने मराठा समाजातील बांधवांना तसेच एन.के.जी.एस.बी. च्या सभासदांना रविवारी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या जवळच्या शाखेत जाऊन आशिर्वाद पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा