शिक्षण संवेदनच्या राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित !
शिक्षण संवेदनच्या राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्काराने नवनाथ रणखांबे सन्मानित !
( न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१)
ठाणे / कल्याण( प्रतिनिधी)::-शिक्षण संवेदन मासिकाच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार २०२२ ने प्रा. प्रदीप वाघ आणि प्राचार्य डॉ. माधव गवई ( संस्थापक-संपादक, शिक्षण संवेदन ) यांच्या हस्ते आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. कमल गवई , प्राचार्य डॉ सुभाष कंदारे, डॉ. अर्पणा प्रभू, डॉ केशव जाधव, अँड दिलीप वाळूंज, विजयसिंह नाईक, राजेंद्र पगारे इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि प्रतिभावंतांचा पुरस्कार देऊन सन्मान यावेळी करण्यात आला.
जीवन संघर्षकार विद्रोही कवी लेखक नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय विद्रोही साहित्यरत्न पुरस्कार २०२२ ने सन्मानित केल्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा