ग्रामविकासाची शाळा ! सर्वसाधारण पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच पुस्तक !
नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध !
नाशिक जिल्हा परिषदेचे २१मार्च, २०१२ ते २० मार्च, २०१७ या कालावधीतील पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या पुस्तकाचे संपादक म्हणून उपमुख्य कार्यकारी आनंदराव पोपट पिंगळे यांनी जबाबदारी स्विकारुन पुस्तकाचे संकलन व संकल्पना आरोग्य विभागाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी जी.पी. खैरनार यांनी केले आहे. जिल्हा परिषदेत दिनांक २८फेब्रुवारी, २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीद्वारे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मध्यान्ह काळात "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, ऑनलाइन सभेत उपस्थित आरोग्य व शिक्षण समिती सभापती सौ. सुरेखाताई दराडे, समाजकल्याण समिती सभापती सौ. सुशिला मेंगाळ, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अश्विनीताई आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, व ऑनलाइन सभेत उपस्थित विषय सर्व पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
"ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकास अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मनोगत रुपी प्रस्तावना केली असुन संपादक म्हणुन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी प्रस्तावना केली आहे. त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोच्च असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहातील ३८ सर्वसाधारण सभांचे विविध धोरणात्मक निर्णयांचे १००१ ठराव समाविष्ट आहेत.
"ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र राज्यातील पहिलेच पुस्तक ठरले आहे.
"ग्रामविकासाची शाळा" हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी जी. पी. खैरनार यांनी मेहनत घेऊन एक चांगला व वेगळा उपक्रम अंमलात आणला त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत शिरसाठ यांनी सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडला व त्यास सदस्य यतीन पाटील यांनी सभागृहाच्या वतीने अनुमोदन दिले.
********************************
जी. पी. खैरनार यांनी एक वेगळा विषय हाती घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तक प्रकाशित केले त्यांचे अभिनंदन करते. या अभिनव उपक्रमाच्या पुस्तकाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री,मुख्य सचिव, ग्रामविकास सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.
लीना बनसोड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक
*******************************
नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झाले ही नाशिक जिल्हा परिषदेसाठी अभिनंदनीय गोष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे यांनी संपादित केलेले व आरोग्य विभागाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी जी. पी. खैरनार यांनी संकलित करुन प्रसिद्ध केलेले जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे पुस्तक त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरेल.
बाळासाहेब क्षिरसागर
अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक
************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा