श्री.आपासो.देवरे विद्यालयात लेझीम पथकासह शिवजयंती उत्साहात साजरी !




श्री.आपासो.देवरे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

खोंडामळी(प्रतिनिधी)::- श्री.आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विदयालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दाखले देत रयतेच्या कल्याणासाठी झटणारा एकमेव राजाची गाथा स्पष्ट केली. विद्यार्थीनींनी लेझीम पथकाचे संचलन करून गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
   या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक एम.डी.नेरकर, वार.डी.बागुल, आर.एम.पाटील, एस.जी.पाटील, श्रीम.एम.आर.भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डी.बी.भारती यांनी केले. तसेच कार्यक्रमाला विखरण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !