ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने जि. प. कामकाजाचा आढावा ! महीला बचत गटाच्या वतीने तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रातिनिधिक स्वरुपात देऊन स्वागत केले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!



ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने जि. प. कामकाजाचा आढावा

      नाशिक(प्रतिनिधी)::- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी आज नाशिक जिल्हा परिषदेतील सर्व विभागांची आढावा बैठक घेतली, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे महिला बचत गटांच्या वतीने तयार केल्या गेलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू या प्रातिनिधिक स्वरूपात देऊन स्वागत केले.
         राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची माहिती घेत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा यावेळी ना. हसन मुश्रीफ यांनी घेतला, विविध विकास योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाचा किती निधी उपलब्ध आहे यातील खर्चित अखर्चित निधीची माहिती घेतली, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात एकूण किती घरकुलांचे उद्दिष्ट आणि पूर्तता झाली याची देखील माहिती घेतली व महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे सांगितले. पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन लाभार्थी योजनेंतर्गत भूमिहिनांना जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी जमिनी, गायरान जमिनी, महामंडळाच्या जमिनीतून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
        लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने ग्रामीण भागात पाझर तलावांचे काम हे जिल्हा परिषदेमार्फत केले जावे अशी विनंती करण्यात आली याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
        ग्रामपंचायत विभागाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाणून घेतले, त्याचबरोबर २०२०-२१, २०२१-२२ च्या जिल्हा नियोजनाच्या उत्कृष्ठ कामकाजाबाबत प्रशासनाचे कौतुक केले.
        आस्थापना विषयक माहिती जाणून घेताना २२१ अनुकंपा पदांची भरती, मुख्याध्यापक पदोन्नती, सर्व सेवा ज्येष्ठता याद्यांचे प्रारूप यादी १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याबाबतदेखील प्रशासनाचे कौतुक करत रिक्त पदांचा अनुशेष तत्काळ भरण्याचे निर्देश दिले.
         या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !