वसईच्या नागले गावातील "यश" ! खेड्यातील मुलगा देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो या अभिमानास्पद बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
वसईच्या नागले गावातील "यश"
न्यूज मसाला वृत्तसेवा
वसई (गुरुदत्त वाकदेकर) : संपूर्ण भारतातून एनसीसी कॅडेटचे शिबिर ग्वालियर, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातील नागले गावातील यश अनिल पाटील यांनी संत गोंसलो गार्सिया महाविद्यालयाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून २८ व संपूर्ण भारतातून २४८ एनसीसी कॅडेट्स यात सहभागी झाले होते. यश याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत "खडक चढणी व गोळीबार" स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला. शिबिरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची संस्कृती यावर आधारित कार्यक्रम झाला.
डिजी एनसीसी लेफ्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांनी प्रेरणादायी विचार सर्व सहभागी एनसीसी कॅडेट्स समोर व्यक्त केले. सदरचे एनसीसी शिबिर हे कर्नल अरविंद दास यांच्या निरीक्षणाखाली पार पाडले. छोट्याशा गावातील एक हुशार मुलगा देश पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो ही नक्कीच नागले वासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्व स्तरातून "यश"च्या यशाचं कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा