जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर !
शिंदे. ता. जि. नाशिक
दिनांक १० डिसेंबर रोजी शिंदे गाव, तुळजाभवानी लान्स, नाशिक पूना हायवे, टोल नाक्या जवळ, नाशिक येथे आमदार सरोजताई आहेर यांच्या अध्येक्षतेखाली दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरण आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी पंचक्रोषीतील दिव्यांग बंधू -भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शिबिरामध्ये कोविड १९ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील नाशिक तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी कोविड १९ लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोसचे लसीकरण करून घेतले. सदर दिव्यांग कोविड १९ लसीकरणासाठी तालुक्यातील मान्यवर पंचक्रोषीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपस्थित होते, तसेच तालुका स्तरावरील अधिकारी तहसीलदार अनिल दौंड, नासिक पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहा. गटविकास अधिकारी विनोद मेठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, विस्तार अधिकारी सानप, अबू नाना शेख, प्रा. आ. केंद्र. शिंदे येथील आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा