एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये ! २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ ! आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये !
२८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस !
आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ !
आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी !
नाशिक - दि . ११: मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटने आता नाशिकमध्ये आपले केंद्र सुरु केले असून, नाशिकच्या प्रेरणादायी वक्त्या व योग गुरु छोट्या गुरु माँ , एलन करिअर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष जीवनज्योती अग्रवाल व एलन च्या मुंबई शाखेचे मार्गदर्शक अमित मोहन अग्रवाल यांनी विधिवत पूजन आणि फित कापून अनौपचारिक शुभारंभ केला. नीट आणि आयआयटी, जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी दि २८ डिसेंबर पासून कॅनडा कॉर्नर स्थित बिजिनेस स्क्वेअर येथे नवीन बॅचेस सुरु होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
छोटी गुरु माँ यांनी यावेळी बोलताना सांगितले की , शिक्षणाबरोबरच संस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. घरातील मोठी माणसं असतील किंवा शिक्षक यासर्वांनी विद्यार्थ्यांवर योग्य त्या संस्कारासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी योग आणि शारीरिक व्यायामासाठी प्रवृत्त करायला हवे. कारण स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन राहते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जीवनज्योती अग्रवाल व अमित मोहन अग्रवाल यांनी सांगितले की , महाराष्ट्रातील विदयार्थी आयआयटी, जेईई , नीट, ऑलिम्पियाड, केवीपीवाय आणि एनटीएसई सह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने चांगली प्रगती करत आहेत. अनेक परीक्षांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी टॉप केले आहे. अशावेळी येथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, एलन करिअर इन्स्टिट्यूट ने मुंबई, पुणे, नांदेड, नागपूर नंतर नाशिकमध्ये कोचिंगचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. एलन कडून येथे आयआयटी, जेईई, मेडिकल इंट्रान्स परीक्षा नीट बरोबरच एमएचटी -सीईटी, ऑलिम्पियाड आणि बोर्ड परीक्षांची तयारी करून घेतली जाईल. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर स्थित स्टडी सेंटर मध्ये दि. २८ डिसेंबरपासून नियमित वर्ग सुरु होतील.
********************************
करिअर आणि काळजी दोन्हीही
जीवनज्योती यांनी सांगितले की , नाशिकमध्ये एलन ची सुरुवात प्रथम काळजी या अटीवर होईल. लॉकडाउनच्या काळात ज्या जबाबदारीने कोटा ने एलन स्टुडंटस वेल्फेअर सोसायटी द्वारा ५० हजार विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहचते केले आणि सध्या ज्याप्रमाणे कोविड च्या गाईड लाईन्स पाळून वर्ग चालविले जात आहेत तेच नियम येथेसुद्धा लागू करण्यात आले आहेत. विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जाईल. एलन स्टुडंटस वेल्फेअर सोसायटी च्या निर्देशानुसारच विद्यार्थ्यांना हॉस्टेल आणि प्रवासाची सुविधा दिली जाईल.
*********************************
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण
अमित मोहन अग्रवाल म्हणले की , महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे जास्त कल आहे आणि डॉक्टर व इंजिनिअर होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण ही महत्वाचे आहे. एलन इन्स्टिट्यूट कोटा कोचिंग च्या ३३ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जबाबदारी घेत आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बाहेर जावे लागते किंवा आहे त्यात समाधान मानावे लागते , मात्र आता तसे होणार नाही.
*********************************
२८ डिसेंबर पासून बॅच सुरु
एलन करिअर इन्स्टिट्यूट नाशिक मध्ये २८ डिसेंबर पासून नीट व आयआयटी, जेईई च्या बॅच चा प्रारंभ होईल. २० जानेवारी पूर्वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाना प्रवेश शुल्कात खास सवलतही देण्यात येईल. या व्यतिरिक्त एलन स्कॉलरशिप टेस्टही घेण्यात येणार आहे. यामध्ये कामगिरीनुसार विद्यार्थाना ९० टक्केपर्यंत स्कॉलरशिप दिली जाईल. यामुळे विद्यार्थाना दुहेरी लाभ होणार आहे.
**********************************
एलन ने दिले ऐतिहासिक निकाल !
१८ एप्रिल १९८८ रोजी स्थापन झालेल्या एलन इन्स्टिट्यूटशी आतापर्यंत सुमारे १४ लाख ३० हजाराहुन अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सतत वाढणारी विद्यार्थी संख्या हा पालकांनी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. एलन १० हजार पेक्षा जास्त सदस्यांचा मोठा परिवार असून ३५ शहरांमध्ये स्टडी सेंटर्स चालवत आहे. सन २०२१ मध्ये जेईई एडव्हान्स्ड मध्ये एलन ची विद्यार्थिनी मृदुल अग्रवाल हिने ऑल इंडिया टॉप केले आणि आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त गुण मिळवले आहेत. यापूर्वीही २०१४ मध्ये एलन च्या विद्यार्थांनी मेडिकल आणि इंजिनिअरींग च्या परीक्षांमध्ये ऑल इंडिया प्रथम रँक मिळालेली आहे. पुन्हा २०१६ मध्ये दोन्ही मोठ्या परीक्षांमध्ये अखिल भारतीय स्तरावर एलन चे विद्यार्थी प्रथम, व्दितीय व तृतीय आले. देशातील प्रतिष्ठित समजली जाणारी एम्स च्या परीक्षेत २०१७ मध्ये सर्व टॉप टेन विद्यार्थी एलन चे होते. या निकालाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे. २०१९ मध्ये पुन्हा आयआयटी , जेईई आणि मेडिकल प्रवेश परीक्षेत एलन च्या विद्यार्थांनी बाजी मारत अखिल भारतीय स्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला. जेईई एडव्हान्स्ड मध्ये टॉप २० मध्ये ८ विद्यार्थी हे एलन चे होते. जेईई मेन्स मध्ये टॉप १० मध्ये ३ विद्यार्थी एलन चे होते. २०२० मध्ये मेडीकल प्रवेश परीक्षा नीट मध्ये एलन चा विद्यार्थी शोएब आफताब ने नीट च्या इतिहासात प्रथमच ७२० पैकी ७२० गुण मिळवत आलं इंडिया रँक १ प्राप्त करत इतिहास रचला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा