लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन ! साप्ताहिक न्यूज मसाला व लोकराजा दिवाळी विशेषांक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!


लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे निधन !


नाशिक ( प्रतिनिधी ) लोकप्रिय व्यंगचित्रकार अनंत दराडे यांचे काल ( दि.१३) अल्प आजाराने निधन झाले. ते विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक होते. सातत्याने व्यंगचित्रे रेखाटून त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजप्रबोधन करीत. राजकीय व्यंगचित्रांद्वारे हसवता हसवता त्यांनी वाचकांना नेहमीच अंतर्मुख केले. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच वृध्द आईवडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांचे स्नेही व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी अनंत दराडे यांचे कॅरिकेचर रेखाटून अर्पण केलेली ही श्रद्धांजली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !