त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा ! पिंच्याक सिलॅट खेळाविषयी थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट
स्पर्धा !

          नाशिक : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंक्याच सिलॅट स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवार (दि.२३) १४ ते १७  वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन दुपारी दोन वाजता खासदार हेमंत गोडसे, किशोर येवले, तृप्ती बनसोडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता होईल तर अंतिम बक्षीस वितरण सभारंभ २४ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता होईल.

पिंच्याक खेळाविषयी-----

कसा आहे पिंच्याक सिलॅट खेळ

पिंच्याक सिलॅट हा न इंडोनोशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून तो टँडिंग(फाईट), तुंगल (सिंगल कत्ता), रेगू (गु्रप कत्ता), गंडा (डमो फाईट) या चार प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० रोेजी या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या ५ टक्के राखीव नोकर भरती खेळाअंतर्गत केला. त्याला ‘युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारची मान्यता असून हा एशियन गेम्स, एशियन मार्शल आर्ट गेम्स, यूथ गेम व बिच गेम, भारतीय विद्यापीठ खेळ अशा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळला जातो. गेली १० वर्ष महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असो. चा संघ राष्ट्रीय पातळीवर अव्वलस्थानावर आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या खेळामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदके मिळवून राज्याचा नावलौकीक वाढवला आहे, अशी माहिती किशोर येवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला नाशिक पिंचाक सिलाट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गवई, उपाध्यक्ष डॉ. विशाल जाधव, सचिव नागेश बनसोडे, खजिनदार किर्ती गवई, डॉ. उज्ज्वला निकम, राम जगताप, इंडियन कोच निखिल साबळे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।