भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या दोन दिवसीय अभिनव पथ परीषदेचे उद्घाटन !! परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण !!
भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय " अभिनव पथ " प्रादेशिक परिषदचे, उदघाटन नाशिक येथे दि ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे आणि जळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शाखेत करण्यात आले. सदर परिषदेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड, प्रमुख अतिथी म्हंणून उपस्थित होते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव व धुळे परिसरातील २०० पेक्षा अधिक सनदी लेखापालांनी या परिषदेत भाग घेतला.
या परिषदेत सीए. राजेंद्र शेटे लिखित “दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स” या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी सीए. राजेंद्र शेटे यांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले कि कोणता हि व्यवसायिक फसवणूक करण्यासाठी व्यवसाय सुरु करत नाही, परंतु अशा प्रकार ची परिस्थिती निर्माण होते कि जी त्याला फसवणूक करण्यास भाग पाडते, अशा परिस्थितीलाच आर्थिक गैरव्यवस्थापन असे म्हणतात. सदरच्या पुस्तका मध्ये आर्थिक व्यवस्थापनाचे सहा महत्वाचे नियम दिले आहेत, तसेच सहा महत्वाचे रेड फ्लॅग्स नमूद केलेले आहेत. हे आर्थिक व्यवस्थापनाचे नियम जर प्रत्येकाने पाळले व रेड फ्लॅग वर लक्ष्य केंद्रित केले तर आर्थिक गैव्यवस्थापना पासून व्यवसाय वाचू शकतो. सदरचे पुस्तक मराठी तसेच इंग्रेजी या दोन्ही भाषां मध्ये सीए इंस्टिट्यूट तर्फे प्रसिद्ध करण्यात आले. सर्व सामान्यांना समजेल अश्या शब्दात सदरचे पुस्तक लिहलेले आहे.
सीए इंस्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी या परिषदेसाठी व पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.
या परिषदेत पश्चिम विभागाच्या अध्यक्ष सीए. मनीष गाडिया यांची उपस्थिती होती. अधिवेशनाचे यशस्वी आयोजन नाशिक शाखेचे अध्यक्ष राजेंद्र शेटे, तसेच उपाध्यक्ष सोहिल शाह,सचिव राकेश परदेशी, संजीवन तांबुलवाडीकर,हर्षल सुराणा, रोहन आंधळे आदींनी केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा