पुढच्या पिढीला "वैभवशाली" इतिहास सांगताना,,,,,,,,. काॅग्रेस कमिटी कार्यालय !!


    नासिक::- शहर व जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी एकेकाळी सतत गजबजलेले,  एमजी रोडवरील काॅंग्रेस भवनाची आजची विदारक परिस्थिती. कार्यालय बंद, बाकावर कुणीतरी वामकुक्षी घेत आहे, युवक काँग्रेस चा फलक, गवताने पेव्हर ब्लाॅकमधून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा केलेला प्रयत्न शहर व जिल्हा कमिटीलाच संदेश देत असावा.
पक्षाच्या झेंड्याखाली येत याच भवनातून मंत्रीपद, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्यत्व मिळाले, त्याच मातृसंस्थेची दुरावस्था बघताना कुणालाही दखल घ्यावीशी वाटू नये ही खेदजनक बाब म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी असलेले भवन ! राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाची अशी अवस्था बघून सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल ? याच भवनातून मिळालेल्या जहागिरीला आता जागण्याची वेळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे हायटेक कार्यालये, सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या ही कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आणि वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या पक्षात व त्या कार्यालयात अशी मरगळ का यावी असा प्रश्र्न आपसूकच सर्वसामान्यांच्या चर्चेत दिसून येतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !