दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार ' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


दिवाळीत घरोघरी दिवे उजळणार

' घर तिथे दिवा ' उपक्रमाला प्रारंभ !

   नाशिक ( प्रतिनिधी )  प्रभाग क्रमांक सहा मखमलाबाद येथे ' घर तिथे दिवा ' या विशेष उपक्रमाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेना उपमहानगरप्रमुख अंकुश प्रकाश काकड व सौ. सुवर्णा अंकुश काकड यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू करण्यात आली. या
उपक्रमामागील उद्देश कोरोनासारख्या महामारीमध्ये जी असंख्य कुटुंबे उध्वस्त झाली त्यांना मायेचा आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे हा आहे.
   मागील दीडवर्षात अनेक कुटुंबामधील कर्तेधर्ते पुरुष, कमावती तरुण मुले, घरातील महिला - भगिनी यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे कुटुंबांमध्ये दाटून आलेला अंधार दूर करण्याकरिता ' घर तिथे दिवा ' हा उपक्रम हाती घेतला. त्यातून शिवसेना सदैव आपल्या पाठीशी राहील हा संदेश देण्यात आला. शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठानने सहकार्य केले. उपक्रमाच्या प्रारंभी देवी मंदिरात दिवे प्रज्वलित करून कोरोनाचा सर्वत्र नायनाट व्हावा अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी नगरसेविका मनीषा हेकरे, विभागप्रमुख योगेश काकड, शाखाप्रमुख चिंतामण उगलमुगले, युवा नेते वैभव काकड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून संयोजकांना शुभेच्छा दिल्या. यापुढेही दिवाळीपर्यंत हा उपक्रम सातत्याने सुरु राहील अशी माहिती देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !