ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे
पंचवटी (दि.२० सप्टेंबर) - या आध्यात्मिक वातावरणात येऊन मला खूप छान वाटले. बाहेर समाजात फिरताना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मात्र येथे दहा मिनिटातच मला सुख शांतीची अनुभूती झाली. ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य महान आहे. या कार्याची समाजाला गरज आहे. समाजात फोफावत चाललेली गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे, हे ब्रह्मकुमारी संस्थेने अधोरेखित केले आहे. समाजसुधारणेचे हे महान कार्य ब्रह्माकुमारी संस्था करीत आहे असे प्रतिपादन पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी केले. दिनांक १९ सप्टेंबर रोजी ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवाकेंद्रात राजयोग शिबीराच्या समापन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी प्रा. सुरेश साळुंखे, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, सप्तशृंगी मित्रमंडळाचे सतनाम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रात दिनांक १० ते १९ सप्टेंबर पर्यंत दहा दिवसीय ध्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या-नव्या साधकांनी शृंखला ध्यान पद्धतीतून सलग दहा दिवस स्व चिंतन व प्रभु चिंतन करून कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर विश्वशांतीसाठी मनोकामना केली. साधकांनी रोज दोन तास बसून ध्यानधारणा चे नियोजन केले .
आपल्या वक्तव्यात पोलीस निरीक्षक कोल्हे पुढे म्हणाले की महिला ही कुटुंब व्यवस्थेचा प्रमुख घटक आहे महिलेला जर आपण सशक्त व सुसंस्कृत केले तर ती आपल्या कुटुंबासहित समाजाला सुद्धा चांगले वळण लावू शकते हेच कार्य ब्रम्हाकुमारी संस्थाच्या माता भगिनींनी इतक्या वर्षांपासून करीत आहेत. प्राध्यापक साळुंखे सरांनी संस्थेचा परिचय करून दिला तर ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह कैदी बांधवांसाठी होत असलेल्या अध्यात्मिक कार्याची माहिती दिली. सोबतच कोल्हे यांना माउंट आबू मुख्यालयात राज योग शिबिराचे निमंत्रण सुद्धा दिले. ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी स्थानीय सेवाकेंद्रात साप्ताहिक कोर्स चे निमंत्रण कोल्हे यांना दिले व कोल्हे यांनी ते सहर्ष स्वीकारले. कार्यक्रमात मोजक्या संख्येने ब्रह्माकुमारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीके ओंकार बिके सतीश बी के मनोहर आदी सदस्यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा