गंभीर आजाराशी लढणाऱ्या 'राजाभाऊं' च्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? दिलेल्या फोन नंबरवर व्हिडिओ काॅल करून खात्री पटली तरच मदत करा अशी आर्त विनवणी !! दानशूर संस्था, नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीची अपेक्षा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि बोडकेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊया- संपादक न्यूज मसाला !!


गंभीर आजाराशी लढणाऱ्या 'राजाभाऊं' च्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का?

दानशूर संस्था, नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीची अपेक्षा

नाशिक : प्रतिनिधी::- तब्बल आठ वर्षांपासून एका गंभीर आजाराशी मोठ्या धैर्याने लढा देणाऱ्या सिडकोतील  'राजाभाऊ' म्हणून सुपरिचित असणाऱ्या राजेंद्र बोडके यांच्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? अशी आर्त हाक त्यांच्या कुटुंबीयांनी घातली आहे. अत्यंत दुर्मिळ आणि खर्चिक आजारावर मात करण्यासाठी बोडके कुटुंबीयांनी आजपर्यंत  २० लाखांहून अधिक खर्च केला आहे. मात्र आता त्यांचे वेतनही बंद केल्याने हा खर्च त्यांना पेलवत नसल्याने दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले आहे.

सिडकोतील राणाप्रताप चौक येथील रहिवासी असलेले  राजेंद्र रघुनाथ बोडके हे  पंचायत समिती कर्मचारी असून, त्यांना सन २०१३ पासून 'हिड्राडेनिटिस सुपराटिव्हा' या त्वचेच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. आधी बरेच दिवस या आजाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा या आजाराने गंभीर रूप धारण केले होते. आता तर दोन वर्षांपासून या आजाराचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. रजा संपल्यामुळे जिल्हा परिषदेने वेतनही वर्षापासून बंद केले आहे. दोन वर्षांत २० लाखांहून अधिक खर्च झाला असून, यापुढील काळातही उपचाराकरीता २० ते २५ लाखांची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दानशुरांनी सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती रूग्ण राजेंद्र बोडके व परिवारातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज तयार केला असून, मदतीची याचना केली आहे.

**********************************
लाखात एखाद्याला लागण::-
हा एक दुर्मिळ आजार असून, एक लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला हा गंभीर आजार होत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व त्वचारोग तज्ञांनी व्यक्त केले आहे. या गंभीर आजारावर बोडके यांनी आतापर्यंत मुंबई, वापी गुजराथ व नाशिक येथील १० ते १२ डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत. अद्याप अपेक्षित असा फरक पडलेला नाही.

दिवसाला दोन हजार रुपये खर्च::-
राजेंद्र बोडके यांना या आजारात शरीराच्या काही मुख्य भागांवर गंभीर जखमा झालेल्या आहेत. या जखमा दररोज स्वच्छ कराव्या लागतात आणि मलमपट्टी करावी लागते. केवळ मलमपट्टीसाठीच दररोज १ हजार रुपये खर्च लागतो आणि अन्य गोळ्या-औषधांना १ हजार असा सुमारे २ हजार रुपये दररोज खर्च लागतो.

....तरीही अद्याप फरक नाही::-
आजार बरा होईल या आशेपोटी बोडके यांनी आतापर्यंत अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशा सर्वच प्रकारचे उपचार घेतले आहेत. नाशिकमधील सुजाता बिरला हॉस्पिटल व मेडीकल रिसर्च सेंटर, त्वचारोगतज्ञ डॉ.अनिल गुगळे, डॉ.सुनिल वर्तक, डॉ.सदानंद नायक,डाॅ.मिलिंद देशमुख, डॉ.संजय पिचा तसेच होमिओपॅथीतज्ञ डॉ. मुसळे यांच्याकडे उपचार घेतले आहेत. सध्या ते आडगाव येथील मविप्र रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
सध्या दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला केंद्रीय आरोग्यमंत्रीपद लाभले आहे. त्यामुळे राजेंद्र बोडके यांच्या गंभीर आजाराची दखल डॉ. पवार या घेतील का आणि आर्थिक मदत मिळवून देत बोडके यांच्या जखमांवर फुंकर घालतील का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

येथे करावी मदत::-
राजेंद्र बोडके यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असून, ३०११२५४३४१५ हा खाते नंबर तर  SBIN 0011803 हा आयएफएससी कोड आहे. ९०११६८२४८४ या मोबाईल क्रमांकावर फोन पे आणि गुगल पे देखील करता येईल. दानशुरांनी वाटल्यास व्हिडिओ कॉल करून आजारासंदर्भात खात्री करावी नंतरच अर्थिक मदत करावी, असे आवाहन रूग्ण राजेंद्र बोडके (९०११६८२४८४) आणि रूग्णाची आई मंदाकिनी बोडके (8275015692) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !