स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा
महेश शिरोरे यांजकडून
कळवण(१३)::-पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल . कोणत्याही क्षेत्रात संघटित होऊन काम केल्यावर निश्चित पणे आपल्याला यशस्वी होता येते. बचत गटांमार्फत ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घ्यावा असे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कळवण तर्फे राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षणक्षेत्रात सेवाभावी समाजाभिमुख कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी दिला जाणारा नेशन बिल्डर टीचर्स अवार्ड या मानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री निलिमा मिश्रा बोलत होत्या. याप्रसंगी श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्ताराधिकारी शितल कोठावदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे, सचिव संभाजी पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नयना पगार, सचिव निर्मला संचिती रोटरॅक्ट अध्यक्ष केतकी पगार, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश भामरे यांनी केले तसेच विलास शिरोरे यांनी रोटरी कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी रोटरीचा जीवनगौरव पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते नीलिमा मिश्रा व डॉ. जे.डी.पवार यांना रोटरीचे प्रांतपाल विलास शिरोरे व जितेंद्र कापडणे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड कळवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी क्लब कळवण कडून शाल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कळवण तालुक्यातील २१ आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र घडते या वृत्तीतून कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने वाडीवस्तीवर प्रत्यक्ष गृहभेटी देत विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकांनी केलेले आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान, संस्कार, शिस्त व जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आजच्या डिजिटल युगात शिक्षकांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. म्हणूनच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांमधून शामकांत जगताप ( ककाणे), संदीप आहेर ( शिंदेवाडी), महेंद्र भामरे (वीरशेत), कमल महाले (कनाशी), विलास भोये ( सप्तशृंगी गड), चंद्रकला चव्हाण (अभोणा मुले), स्वप्नील गजभिये (काठरे दिगर), दिनेश गावित (जुनी बेज), दिपाली आहेर (दह्याने ओ), गोपीनाथ गायकवाड (उमरेबन), मीना साळुंके (साकोरेपाडा), मीना निकम (जयदर), कैलास पवार (दळवट), धनंजय देवरे (भगू्रडी), वैशाली जगताप (सरले दि), मनोजकुमार अहिरराव (देवळीवणी), रुपाली गायकवाड (रवळजी), प्रकाश भोये (ओझर), विजया बिरारी (शिरसमणी), दीपक देवरे (एसपी मानूर), मुख्याध्यापकातून विकेश बागुल (अभोणा ) व केंद्र प्रमुखांमधून देविदास पगार (बंधारपाडा) यांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रमाणपत्र, ट्राफी व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष महारू निकम, शरद पवार पब्लिक स्कूलचे प्राचार्य बी एन शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे, सेक्रेटरी संभाजी पवार, सह प्रांतपाल विलास शिरोरे, जितेंद्र कापडणे, रोटरी क्लब कळवण चे माजी अध्यक्ष राजेश मुसळे, गंगाधर गुंजाळ, मोहनशेठ संचेती, सुभाष जैन, संंजय बगे, प्रमोद सुर्यवंशी, निंबा पगार, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, सुभाष जैन, बापू कुमावत, प्रा. व्ही.डी. सोनवणे, डॉ. रवींद्र पगार, अविनाश पगार, गंगा पगार, डॉ. तुषार पगार, अॅड. भाऊसाहेब पवार, प्रविण संचेती, विकेश बागुल, युवराज सोनवणे, गालिब मिर्झा, सुवर्णा पगार, सीमा मुसळे, रवींद्र बोरसे, सुधाकर खैरनार, भास्कर भामरे, कुंदन दाणी, ईनरव्हील क्लब च्या अध्यक्षा नयना पगार, सेक्रेटरी निर्मला संचेती, स्नेहा मालपुरे, मंजुषा देवघरे, जयश्री शिरोरे, रेखा सावकार, मीनाक्षी मालपुरे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष केतकी पगार व सदस्य, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सोनवणे व आभार प्रदर्शन संभाजी पवार यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा