शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


शिलापूर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे

खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन

माडसांगवी वार्ताहर : शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा या खा. हेमंत गोडसे यांनी केलेल्या  प्रयत्नांना यश आले आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या शिलापूर येथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे आज रविवारी सकाळी खा. गोडसे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने शिलापूर, विंचूर गवळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. या भुयारी मार्गाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होणार असून या भुयारी मार्गामुळे शिलापूर, विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होणार आहे. या भुयारी मार्गामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला शेतीमालाची वाहतूक करणे अगदीच सहज सोपे होणार आहे.

शिलापूर परिसरातून मध्य रेल्वेचा लोहमार्ग जात असल्याने शिलापूर आणि विंचूर गवळी या दोन मोठ्या गावांचा थेट संपर्क होत नव्हता. येथील नागरिकांना औरंगाबाद रोड महामार्ग आणि शिलापूर येथे जाण्यासाठी माडसांगवी किंवा आडगाव मार्गे जावे लागत असे. यामुळे शिलापूर आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी नाशिक वा अन्य ठिकाणी नेणे अवघड तसेच खर्चिक होत असे. यामुळे शिलापूर जवळील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग व्हावा, यासाठी शिलापूर आणि विंचूर गवळी येथील शेतकरी गेल्या चाळीस वर्षांपासून प्रयत्नशील होते. याची दखल घेत खा. गोडसे यांनी या भुयारी मार्गासाठी गेल्या काही वर्षांपासून दिल्ली दरबारी प्रयत्न सुरु केले होते. खा. गोडसे यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्याला यश आल्याने काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने शिलापूर येथील रेल्वे क्रॉशींगवर भुयारी मार्गाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. अखेर आज रविवारी या मंजुरी मिळालेल्या भुयारी मार्गाचे भूमिपुजन खा. गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान उपनेते बबनराव घोलप, भास्कर कहांडळ, अनिल ढिकले, आत्माराम दाते, सुधाकर पेखळे, शिलापूरचे सरपंच मंदाबाई गांगुर्डे, उपसरपंच रमेश कहांडळ, बापू कहांडळ, तंटा मुक्ती समिती उत्तम शिंदे, सोसायटी चेअरमन बबन कहांडळ, अभिषेक खुर्दळ, हरी बोराडे, योगिता कहांडळ, पुणे मेट्रोचे आर्क्रिटेक्ट पराग घोलप, रेल्वेचे अधिकारी शर्मा सर आदींसह दोनही गावांमधील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. भुयारी मार्गापासून शिलापूर आणि विंचूर गवळी या दोन गावांकडे जाणाऱ्या प्रत्येकी एक-एक किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करुन देण्याची सूचना खा. गोडसे यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !