बाॅईज टाऊन पब्लिक स्कूलचा अनोखा गौरव सोहळा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


अनोखा गौरव सोहळा
!
                                                                           नासिक ::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मधील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा अनोखा ऑनलाईन गुणगौरव सोहळा. बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या २०२०-२१ च्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा आगळा वेगळा ऑनलाइन सत्कार समारंभ दि.१ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी शाळेचे विश्वस्त माननीय नेवील मेहता,  माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ मॅडम, शिक्षकवृंद व यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सध्याच्या परिस्थितीत गुणवंतांचा प्रत्यक्ष सत्कार करणे शक्य नसल्याने शाळेने इ-प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनोखा सत्कार सोहळा आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणवत्तेनुसार शाळेने वेगवेगळी प्रमाणपत्रे तयार केली आणि या इ-प्रमाणपत्रांची झलक या  सत्कार समारंभात  दाखविण्यात आली.
शाळेचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून धनंजय हिरे या विद्यार्थ्याने १००% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक पटकावला तर प्रथमेश बोरसे याने ९८.८०% गुण मिळवून दुसरा क्रमांक प्राप्त केला. तिसऱ्या क्रमांकावर ९८.४०% गुण मिळवणारी प्रेरणा भारंबे ही आहे. शाळेतील ४० विद्यार्थी ९०% आणि अधिक गुण मिळून पास झाले. १७८ पैकी १४३ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकूण ६८ विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांत विशेष प्रावीण्य प्राप्त केले.
विद्यार्थ्यांचा यशाच्या या वाटचालीत शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका, तसेच शिक्षकवृंद यांच्या मार्फत लाभलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे, असे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. नेवील मेहता सर व मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ मॅडम यांनी गुणवंतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !