पिंपळगाव खांबला युवकांच्या आग्रहास्तव म.न.पा अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट !
पिंपळगाव खांबला युवकांच्या आग्रहास्तव म.न.पा अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट !
नासिक::- गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक २२ व ३१ मधील पिंपळगाव खांब ग्रामस्थांनी मागणी केली होती कि आयुक्त साहेबांनी गावाला भेट देऊन समस्या जाणून घ्याव्यात, यासाठी पिंपळगाव खांब गावचे अमित जाधव, नामदेव बोराडे, आनंद बोराडे, राहुल जाधव आदींनी अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांची भेट घेऊन त्यांना तसे लेखी पत्रा द्वारे गावात येऊन समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढावा अशी मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुरेशजी खाडे यांनी स्वतः गावात येऊन पिंपळगाव खांबचा मुख्य रस्ता व रस्ता रुंदीकरणासंदर्भात शेतकऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, तसेच आहे तो रस्ता त्वरित दुरुस्त करू असे सांगितले. दोन्ही लसीकरण केंद्राला, महापालिका शाळेला, व्यायाम शाळेला आणि जाधव वाडी ड्रेनेज ची पाहणी करून व भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यासाठी गावकऱ्यांनीही त्यांचे आभार मानून सत्कार केला. यावेळी सोबत बाळू मामा बोराडे, प्रेमा बाबा बोराडे, प्रभाकर बोराडे, चंदर बाबा बोराडे, सोमनाथ जाधव, सनी पाळदे, जयेश साळवे, राहुल बोराडे, आकाश गायकर, विशाल जाधव, रोशन जाधव, ऋतिक जाधव आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा