एका स्मृतिदिनाची मैफील ! रसिकांनी घेतला घरबसल्या रफीयुगातील गाण्यांचा आनंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
रफीयुगातील गाण्यांचा आनंद
नाशिक ( प्रतिनिधी ) सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या गाण्यांनी श्रोत्यांना तीन दशके मोहून टाकले. तो एक दैवी चमत्कार होता. शनिवारी रंगलेल्या मैफलीचा आनंद रसिकांनी घरबसल्या घेतला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुरेल रफीयुगाची प्रचिती त्यातून नव्या पिढीला आली.
नाशिकचे घन:श्याम पटेल रफीभक्त आहेत. शनिवारी ( दि.३१) सुरेल स्वरांचा बादशहा मोहम्मद रफी यांचा ४१ वा स्मृतिदिन होता. खास त्यानिमित्ताने स्वरगंध प्रस्तुत ' वो जब याद आये ' या मैफलीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता या मैफलीचा आनंद फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रसिकांना घरबसल्या घेता आला. मैफलीत घन:श्याम पटेल यांच्या बरोबरच अमित गुरव,स्मिता पांडे, उषा मोदी या गायक, गायिकांचा सहभाग होता. पटेल व त्यांचे सहकारी गेली ५ वर्षे ३१ जुलैला प. सा. नाट्यगृहात कार्यक्रम सादर करायचे. यंदाही त्यांचा तसाच प्रयत्न होता. मात्र कोविडमुळे ते शक्य झाले नाही.पण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वरगंध घरोघरी पोहोचला.
वो जब याद आये या पारसमणी चित्रपटातील गाण्याने मैफलीचा प्रारंभ झाला. ये दुनिया अगर मिल जाये तो... रिमझिम के गीत..., अभि ना जाओ छोडकर...,तुझे जीवन की डोर से..., आप के हसीन रुख पे...,चौदहवी का चांद हो... दिल पुकारे आ रे आ रे... अशा २२ गीतांनी रंगलेल्या मैफलीची सुरेल सांगता जाने कहा मेरा जिगर गया जी... या लोकप्रिय गाण्याने झाली. सुप्रसिद्ध निवेदक उस्मान पटणी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत व वेगवेगळे किस्से सांगत कार्यक्रमात निवेदनाचे रंग भरले. यावेळी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून धनंजय जैन यांच्या सुसंस्कृती फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी या मैफलीद्वारे कलाकारांनी आर्थिक मदतीचे योगदान दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा