वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक ::- विसरवाडी ता. नवापूर, जि. नंदुरबार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी-१, वर्ग-१) आलोसे हर्षल गोपाळ पाटील लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. तक्रारदार यांची गाय मयत झाली होती, मयत गाईचा विमा असल्याने शव विच्छेदन करणे गरजेचे होते, तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन पोस्टमार्टम करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे १५०/- रुपये गुगल पे द्वारे घेतले, यानंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून ४००/- रुपये लाचेची पंचांसमक्ष मागणी केली व तडजोडी अंति ३००/- रुपये लाच मागणी करून आज दि. १५ एप्रिल २०२५ रोजी गुगल पे द्वारे सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा