येत्या 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान डिजिटल पेमेंट सुविधा –ई रूपी चे उद्घाटन करणार
येत्या 2 ऑगस्ट रोजी पंतप्रधान डिजिटल पेमेंट सुविधा –ई रूपी चे उद्घाटन करणार नवी दिल्ली(३१)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 2 ऑगस्ट रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ई-रूपी या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधानांनी कायमच डिजिटल उपक्रमांचे स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षात, देशातील विविध योजनांचे लाभ निश्चित लाभार्थ्यापर्यंत पोचावेत, त्यातील गळती आणि भ्रष्टाचार थांबावा हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने विविध कार्यक्रम आणि उपाययोजना केल्या आहेत. त्यातही सरकार आणि लाभार्थी यांच्यादरम्यान कमीतकमी मध्यस्थ यंत्रणा असाव्यात असे प्रयत्न करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हाउचर–म्हणजेच ई-पावतीची संकल्पना याच सुशासनाच्या संकल्पनेला पुढे नेणारी ठरली आहे. ई-रूपी विषयी ई-रूपी ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल पेमेंट सुविधा आहे. ही कयूआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. या सोप्या एकरकमी (वन टाइम) पैसे देण्याच्या प्रणालीच्या वापरकर्त्याना यांची पावती, सेवा प्र