१)उत्तुंग झेप संस्थेचा झाडे वाचवू या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! २) राष्ट्रवादीचे शहरात २१०० वृक्षरोपण करून वृक्षसंवर्धन करण्याचे उद्दिष्ट !! सविस्तर बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!




झाडे वाचवू या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !


नाशिक ( प्रतिनिधी )- जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने काल ( दि.५) झाडे वाचवू या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरातील उद्यानालगत दुतर्फा रस्त्यावर झालेल्या या उपक्रमाची संकल्पना उत्तुंग झेप संस्थेचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांची आहे.परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, बकुळ,बहावा अशा ५ भारतीय वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.


      झाडे वाचवू या मोहिमेला नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग, पर्यावरण प्रेमी नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ व परिसरातील नागरिकांचे मनापासून सहकार्य लाभले. यावेळी रोहन देशपांडे म्हणाले, बऱ्याचदा अनेक जुने वृक्ष उन्मळून पडतात. काही कारणांनी वृक्ष हलविण्याची वेळ येते. त्यांचे पुनररोपण करणे गरजेचे आहे. या उपक्रमाला मनपाचे उपायुक्त शिवाजी आमले तसेच विजय गायकवाड, शेख, गिरी आवर्जून उपस्थित होते. पर्यावरण तज्ज्ञ अश्विनी भट यांच्या सूचनेनुसार उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ जुनी बारदाने ओली करुन गुंडाळण्यात आली. या उपक्रमाचे संयोजन संजय जाधव, आदित्य कुलकर्णी, अमित शुक्ल, अक्षरा घोडके, रोहित सोनार व उत्तुंग झेप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले.


    शहर, परिसरात अनेक झाडे जोरदार वाऱ्या - पावसाने उन्मळून पडतात. बऱ्याचदा जुने वृक्ष वाचवण्याची गरज असते. त्यासाठी  पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आदित्य कुलकर्णी यांना ८३०८२५२६७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले. उत्तुंग झेप संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा चमू तेथे पोहोचेल. झाडांचे विनामूल्य पुनररोपण केले जाईल. नवीन झाडे लावण्याबरोबरच जुने वृक्ष वाचवणे व त्यांचे रक्षण, संवर्धन करणे तेव्हढेच महत्वाचे आहे असेही रोहन देशपांडे यांनी समारोप प्रसंगी नमूद केले.

***************************************

राष्ट्रवादीचे नाशिक शहरात २१०० वृक्षरोपण करून वृक्षसंवर्धन करण्याचे उद्दिष्ट

नाशिक (दि.५) - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले. येत्या १५ दिवसात नाशिक शहरात २१०० वृक्षरोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महालेनिवृत्ती अरिंगळेशहर सरचिटणीस संजय खैरनारअंबादास खैरेधनंजय निकाळेडॉ.अमोल वाजे उपस्थित होते.

          सध्याच्या कोरोना विरोधातील लढाईच्या काळात सर्वांना पर्यावरणाचे महत्व अधिक लक्षात आले असून हवेतील प्राणवायुचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धनाची गरज सर्वांना समजली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादीतील सर्व फ्रंटल व सेल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून नाशिक शहरात येत्या १५ दिवसात २१०० वृक्षरोपण करणार असून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संबधित पदाधिकारी व कार्यकर्ता घेणार आहे. नाशिक मधील वातावरण निसर्गरम्य असून चौही बाजूने डोंगराळ भाग व मध्यभागी नाशिक वसले आहे. डोंगराळ भागामुळे नाशिकमध्ये वनक्षेत्र व विविध वनस्पती आढळून येत असतात. यामुळेच नाशिकला थंड हवेचे ठिकाण संबोधतात. परंतु गेल्या दशकापासून वाढती लोकसंख्यावाढते नागरीकरण यामुळे नाशिकमधील विविध प्रदूषणात वाढ झाली असून नाशिकमधील झाडांची कत्तल सुरु झाली आहे. त्यात विविध प्रकारच्या बांधकामांची भर पडत असून मोठ्या प्रमाणात जमिनीची झीज होत आहे. पाणीची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. परिणामी नाशिकचे वातावरण दमट होऊ लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करता हवेतील नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याकरिता व नाशिककरांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रदूषणमुक्त हवा महत्वाची असल्याने झाडांची संख्या वाढविणे गरजेचे असून पावसाळी कालावधीत वृक्षारोपण व संवर्धन करून नाशिक पुन्हा हिरवेगार करण्याचा संकल्प शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला असून सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.

          यावेळी नगरसेवक जगदीश पवारहरिष भडांगेशंकरराव पिंगळेशहर पदाधिकारी बाळासाहेब जाधवविधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठबाळासाहेब गीतेविभाग अध्यक्ष मनोहर कोरडेजीवन रायतेमकरंद सोमवंशीशंकर मोकळप्रशांत वाघसुनिल अहिरेकुणाल बोरसेमोतीराम पिंगळेयुवक पदाधिकारी जय कोतवालचेतन कासवसंतोष भुजबळडॉ.संदीप चव्हाणराहुल कमानकरसंतोष कमोदयोगेश निसाळरविंद्र शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल