सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


न्यूज मसाला परीवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

काल ३१ मे रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सुभाषचंद्र देशमुख साहेब सेवानिवृत्त झाले, पुढील आयुष्यासाठी खुप खूप आरोग्यदायी शुभेच्छा...

अभिमान है हमे कि हम अंग है इस वर्दी कां
बडी किस्मतवालो को मिलता है ये खाकी रंग वर्दी का....
बेईमान को मजबूर बनाती
इमानदार को मजबूत बनाती
जिनके कंधो पर भार है
जनता की अभिलाषा का
मनुष्य होकर भी ये मनुष्य को मिले अधिकारो से वंचित है
तुम्हे सुरक्षित रखने के लिए खुद रातभर नं सोते है
सुनसान अंधेरी रातो में
चूपचाप कटी सन्नाटो में
घूमघामकर थक जाते है
नं जाने कब सोजाया करते है
पत्थर खाकर भी खडे रहे
वो लहू बनकर अडे रहे
जब दुनिया जश्न मनाती है
तब पुलिस फर्जं निभाती है
रातो में सिर्फ चोर ही नहीं घुमते
ये वर्दीवाले रक्षा के लिए तैय्यार रहते है
धूप -छाव सब सहते है
जीवनपथ दुर्गम गहते है
इनके जीवन में अरमान ना कुछ रहते है
जब तन पर खाकी सजती है
इन वर्दी वालो के जीवन का अजिब फसाना है
तीर भी चलाना है और
परिण्दे को भी बचाना है
रात को आँखो में नींद नहीं
ना दिल में करार
ये मोहब्बत नहीं खाकी की नौकरी है मेरे यार...

संसाराचा श्रीगणेशा सुरु झाला

दोन अनोख्या जीवांचे मनोमिलन आणि सात जन्मांच्या सोबतीच्या आणाभाका...,,
सात पाऊलं सोबत चालुन संसाररुपी वेगवेगळ्या आघाड्यांवर खांद्याला खांदा लावून चालण्याची शपथ घेणारी सप्तपदी,,,
आई वडीलांकडे रुजलेलं रोपटं मुळासकट ऊपटुन सासरच्या अंगणात रोपण्यासाठी

आपल्या जीवनवेलीवर ऊमललेल्या फुलांना ऊराशी कवटाळून त्यांच्यांवर अनंत मायेची छाया पसरायची

"छोडेंगे ना तेरा साथ ओ साथी मरते दम तक
असे  म्हणत....इतकी वर्ष गेली.
मी लिहणारी तेज धार ... सरस्वतीची उपासक,
साहेब कायद्याचे धनी
त्यामुळे या दोन वेगळे... रस्ते पण स्नेहबंधन मात्र घट्ट
हा दिवस असाच  आनंदी व्हावा.
हेच निर्मिकाकडे मागण मागितल होत
आपल्या जीवनात आपण अनेक
अनमोल आणि अतूट  क्षण अनुभवले
नाती जन्मोजन्मी ची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांची  प्रेम भरल्या
रेशीम गठीत बांधलेली
तसेच प्रेमाचं नातं
आपल्या उभयतांच
समंजस पणा हे गुपित
सुखी संसाराच
सुखी संसाराची ही वाट चाल
सुख दुःखात मजबूत राहिली
माया ममता नेहमीच वाढत राहिली....
          सिंव्हावलोकन करताना ३० वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजतेने आणि सोप्पी करून दाखवणारी प्रगलभता आपल्या  पाठीमागे उभी असली  कि  आपण कळत न कळत एकमेकांचे होऊन जातो.
           सहजीवन  कुठल्या गणिताच्या भाषेत मांडता येत नाही. अतिशय सर्वसाधारण परिवारातले तुम्ही मेहनती,  मी मनमौजी तुम्हाला तसा एकही मित्र नाही पण मी मात्र बहुतेक social, वास्तवतेचं भान त्यामुळे...... तुम्हाला जास्तच एका बाजूला विश्वास तर दुसरीकडे समजूतदार पणा, नातं स्वीकारण्याची ताकद आणि त्यातून निर्माण झालेली आस्था. आपली मन तशी खूप लवकर एकमेकांशी जोडली गेली. जगण्याचे म्हणून काही संचित असतात तशी माणसं एकमेकांना सांभाळून घेतात. धार्मिक आणि अध्यात्म हा आपल्यातला मध्यबिंदु. त्या गोल गाभाऱ्यातला अंतर्गत नाद  एकच आहे.
             स्वतः विषयी, कुटुंबा विषयी, आणि समजा विषयी आणी देशाविषयी असलेली आंतरिक ओढ आपली सारखीच आहे..... आयुष्यातील अनेक गोष्टी स्वीकारण्याची सहजता तुमच्यात आहे. आणी जगणं रंगवण्यातला आनंद माझ्यात आहे. माणूस, व्यक्ती म्हणून वैयक्तिक आयुष्यचे जमिनीशी स्पर्श असलेला नातं आपण निर्माण करू शकलो, वेगवेगळी आव्हान पेलत गेलो त्यात काही चांगले वाईट प्रसंग आले, कटू घटना तुन कसा सावरायच तुम्ही शिकवलं. वेदना आणी करूणे  पलीकडचे आयुष्य जगताना आलेले हे अनुभवाचे बोल आहेत.
            भल्या भल्या माणसां मध्ये संवेदना फार दुर्मिळ असते पण मुळात नैसर्गिक चांगुलपणा तुमच्यात असल्याने माझ्या सारख्या हरहुन्नरी, आत्मनिर्भर  स्त्री चा  सन्मान कायम राहावा यासाठी तुम्ही मोजलेली किंमत फार मोठी आहे. विंचवाच बिऱ्हाड पाठीवर घेऊन खाण्याचे हाल करत राहिले त्याची कल्पना फारशी कोणाला करता
येणार नाही. अनेकांच्या समजण्यापलीकडचे आहे.
           आपला नातं तसा दोघांन पुरतं मर्यादित नाही तसा अनेकांना जोडणार आहे त्याचा परीघ वयानुसार मोठा होत चालला आहे. त्यात माझे भावंड.... तर आता मुलासोबत -सून ही समावली आहे.
 
"आई वडील  आणि  भावंडानंतर  लग्न  झाल्यावर ज्या  व्यक्तीला  सर्वस्व  मानले  ते  म्हणजे  तुम्ही, माहेर वरून  सासर  ला आल्यावर आपल्या  परिवारा ला  आपलंस  केलं. जीवापाड  जपलं  तुम्हांला आणि  तुम्ही  मला.
एका  अतिशय  सुख वस्तू  घरातील लाडात  वाढलेल्या  मुलीला  तुम्ही  कस  जगायचं याचे  संस्कार  दिले. लग्नात  १२ वी  पास  असलेली  मी  अतिउच्च  पदाच्या  पीएचडी पर्यंत  शिकवलं.... तुमचं ते स्वप्न होत.
तुमच्या  वागण्यातुन  बोलण्यातून  कायम  हेच  जाणवलं. की
  "मुश्किले  दिल  के  इरादे आजमाती  हैं
  सपने  के  परदे  निगाहो  से  हटाती  हैं
   हौसला मत  हरना, गिरकर  ओ
    मुसाफिर
    ठोकरे  इन्सान  को  चलना  सिखाती
     हैं "!
काही  माणसं  स्वभावानी  कशी  का  असेना, मनाने  मात्र  ती  फार सच्ची  आणि  प्रामाणिक  असतात, ते  म्हणजे  तुम्ही.... अत्यन्त  सोशीक , सहनशील, धीर, संयम, वाट  पहान्याची  तयारी त्याग, सेवाभावी दुसऱ्यासाठी  झटण....खरं  तर  तुमच्या  पेशाचा  तो  भाग  आहे. जिद्द, चिकाटी, ध्यास, अथक  प्रयत्न, प्रयत्नात सातत्य, कठोर  शिस्तप्रिय  पण  प्रसंगी  हळवं  मन  ही  तुमच्या  वर्दीआड  दडलेल्या  माणसात  पाहिलंय. ह्या  अश्या  किती  थक्क  करणाऱ्या तु मच्या  गोष्टी.....
प्रत्येकाच्या  वेदनेवर हळुवार  फुंकर  घालण्याच काम  तुम्ही  करत  राहिलात, सागराचा  दाह  पोटात  साठवून  तप्त  भूमीला  शांतवणाऱ्या  मेघासारखं, दूर  अंतरावरून पोटात  अंगार  सोसत धर्ती ला फुलताना  बघून  अनेक  अंगानी  रंगणार  ...   आकाश  तसं  तुमचं  प्रेम, एक  नितळ आरसाच स्वच्छ  पारदर्शी कोणताही  कृत्रिम  लेप  नसलेल उदात्त विशाल. जे  माझ्यासोबत ..... माझ्या  पोरक्या  भावडांना  देखील  दिलंत.....
सत्याचा  अंकुर  संयमाचं  तेज  जगात  ठेऊन  साऱ्या  वेदने वर  मात  करुन  क्षमाशील  वृत्तीने  सर्वांनाच आपलं  म्हणता...  या  अजब  खेळातुन  जिकण्याचं  अवघड  काम  फक्त  तुम्हाला  जमू  शकत.
पूर्वीचे  दिवस तुमच्या  सहवासात, नव्या  आनंदात, नव्या  चैतन्यात  बहरून  आले नंतर  तुमच्या  सतत  च्या  २१/२२ वर्ष बदली  मुळे सर्व  सांभाळून  फार  त्रास  झाला.
किती ही  रागावली  तरी
समजून  घेतले  मला
रुसले , फुगले  तरी  जवळ  घेतले  मला
रडले  असले  कधी  हसवले  मला
सागरासारखी  अथांग  माया 
भरलीय  तुमच्या मनात
कधी -कधी  तर  तुम्ही
माझी  आई  वाटला  मला
माझ्या  भावनाना  केवळ
तुम्हीच  समजू  शकला.
माझ्या  दुःखाने  तुमचे
डोळे  भरून  येतात.
प्रसंगी  खूप  खंबीर  केले  मला
मनातला  आत्मविश्वास 
देऊन  जागृत  केले  मला.

पोलीस  खात्यात  असून  कसलं ही  व्यसन  नसलेल्या  तुम्हाला  जेव्हा  अंगावर  खाकी  वर्दी  चढवून  कर्त्यव
करायला  जेव्हा  जाता  तेव्हा......
म्हणावं  वाटतं...

"जंग  का  एलान  हैं  वर्दी
अन्याय  के लिए न्याय  हैं  वर्दी
किसी  के  खातीर  सिर्फ
खाकी  का  कपडा  हैं  वर्दी
हमारे  खातीर  तो  हमारी
जान  हैं  वर्दी
हमारी  जान  हैं  वर्दी......... . !"

पुष्पकन्या
   डॉ.  वर्षा सुभाषचंद्र  देशमुख

टिप्पण्या

  1. खूप छान! भावस्पर्शी लेखन आहे. पोलीस म्हटला कि, आपल्याला समोर एकच चेहरा येतो परंतु या लेखातून पोलिसांच्या भाव भावना समजतात.
    कर्तव्य कठोर असूनही कोमल भावना असणाऱ्या श्री देशमुख साहेबांना निवृत्तीबद्दल शुभेच्छा! सौ. देशमुख ताईंचे अभिनंदन!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल